एक्स्प्लोर

Goa Budget | गोवा विधानसभेत 353.61 कोटींच्या महसूली शिलकीचा अर्थसंकल्प सादर

सभापती पाटणेकर यांनी विरोधी सदस्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र ती त्यांनी धूडकावून लावल्या नंतर सभापतींनी घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांना मार्शलकरवी सभागृहा बाहेर काढले. गोंधळ सुरु असताना देखील मुख्यमंत्री अर्थसंकल्पाचे वाचन करतच होते.

पणजी: मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी आज आपला 353.61 कोटींच्या महसूली शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. विधानसभेच्या आजच्या कामकाजावर पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना झालेल्या अटकेचे पडसाद उमटले. विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज आज चार वेळा तहकूब करावे लागले. अर्थसंकल्प सादर केला जात असतानाही सभापतींसमोरील हौद्यात येऊन निषेधाच्या घोषणा देणाऱ्या विरोधी आमदारांना अखेर सभापतींच्या निर्देशानुसार मार्शलकरवी सभागृहा बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. विरोधी पक्षांनी अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगत न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहील असे स्पष्ट केले आहे. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. भाजपचे प्रवक्ता प्रेमानंद म्हांबरे यांना धमकावल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी मध्यरात्री पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना अटक करण्यात आली होती. विधानसभा सुरु असल्याने सभापतींची परवानगी मिळाल्या नंतर पर्वरी पोलिसांनी खंवटे यांना अटक करून सकाळी त्यांची जामिनावर सुटका केली होती. विधानसभेच्या कामकाजाला आज सुरुवात होताच विरोधी आमदार खंवटे यांना झालेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती बांधून सभागृहात दाखल झाले. विरोधी आमदारांनी खंवटे यांना झालेल्या अटकेवर नाराजी व्यक्त करत सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतल्यानंतर दुपारी 12 पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. 12 वाजता कामकाज सुरु होताच विरोधक तोच विषय लावून धरत पुन्हा हौद्यात आल्यामुळे दुपारी साडे बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. साडे बारा वाजता कामकाज सुरु होताच विरोधक तोच विषय घेऊन पुन्हा हौद्यात आल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब केले. Goa Budget | गोवा विधानसभेत 353.61 कोटींच्या महसूली शिलकीचा अर्थसंकल्प सादर भोजनानंतर पुन्हा अडीच वाजता कामकाज सुरु झाले तेव्हा देखील विरोधक एकत्र येऊन घोषणा देत सभापतींसमोरील हौद्यात आल्यामुळे सभापतींनी कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब केले. 3 वाजता मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडण्यासाठी सभागृहात दाखल झाल्यानंतर देखील विरोधक शांत झाले नाहीत. त्यांनी पुन्हा हौद्यात जाऊन घोषणाबाजी सुरुच ठेवली. सभापती पाटणेकर यांनी विरोधी सदस्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र ती त्यांनी धूडकावून लावल्या नंतर सभापतींनी घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांना मार्शलकरवी सभागृहा बाहेर काढले. गोंधळ सुरु असताना देखील मुख्यमंत्री अर्थसंकल्पाचे वाचन करतच होते. गोंधळ घालणाऱ्या विरोधी आमदारांना बाहेर काढल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहा समोर अर्थसंकल्प सादर केला. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी विद्यावेतन योजना जाहीर करण्यात आली असून त्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कौशल्य विकासासाठी 6 नव्या प्रशिक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. गोवा साधन सुविधा विकास महामंडळातर्फे सुरु असलेले 50 हुन अधिक विकास प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकार भर देणार आहे. झुवारी पूलाचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची जोडणी करण्याचे लक्ष्य ठेवण्याबरोबरच म्हादईच्या प्रवाह क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सेंद्रीय शेती विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. शेतात काम करणाऱ्यांना मदत करण्यासाठी श्रम सन्मान ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांच्या निवृतीचे वय 60 वरुन 62 करताना त्यांच्या मानधनात देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी पतसंस्थामधील 1 लाख रुपया पर्यंतच्या ठेवींना आता विमा कवच मिळणार आहे. याशिवाय आबकारी कर वाढीतून 100 कोटी रुपयाचा महसुल मिळवण्याचे लक्ष्य ठेवताना प्रतिज्ञापत्रासाठी लागणारी स्टॅम्प ड्यूटी 50 रुपयावरुन 100 रुपये करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget