मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
वास्को आणि चिखली परिसरातील पाच मित्र शनिवारची सुट्टी साजरी करण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कुळे येथील दूधसागर नदी पात्रात उतरले.

पणजी : गोव्याच्या कुळे (Goa) येथील मेटावाडा भागात पुलाजवळील दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या वास्को परिसरातील चार तरुणांचा पाण्यात (River) बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये चिखली-मुरगाव येथील तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या घटनेनं परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत सर्वचजण 19 ते 25 वयोगटातील असून सकाळी घरातून निघताना त्यांनी कुटुंबीयांना नदीपात्रात जात असल्याचेही सांगितले होते. मात्र, आजचा दिवस काळ बनून आल्याची पुसटशी देखील कल्पना कोणाला नव्हती.
रामण्णा मदार, लक्ष्मण मदार, हिरण्णा मदार आणि विजय साजिली अशी मृत चारही तरुणांची नावे आहेत. वास्को आणि चिखली परिसरातील पाच मित्र शनिवारची सुट्टी साजरी करण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कुळे येथील दूधसागर नदी पात्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. नशिब बलवत्तर म्हणून पाच पैकी एक युवक बचावला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, बुडालेल्या तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्या आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा
भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, जोरहाटमध्ये 5 जवानांना वीरमरण, को-पायलट बचावला, उपचार सुरु
Before You Go
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा





















