एक्स्प्लोर
धोका देणाऱ्या बॉयफ्रेण्डच्या घरासमोर डीजे लावून तरुणीचा राडा
संदीप सहवाग या फेसबुक यूजर्सने हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केला असून, त्यानं म्हटलंय की, “गुरुग्रामच्या पटौदी शहरातील हेलमंडीमध्ये एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेण्डच्या घराबाहेर डीजे लावून, डान्स केला. बॉयफ्रेण्डने धोका दिल्याने, तिने ही कृती केली.”
नवी दिल्ली : सोशल मीडियावर रोज काहीना काही व्हायरल होतच असतं. यातील अनेक पोस्ट व्हायरल होण्याबरोबरच ट्रोलदेखील होतात. पण सध्या सोशल मीडियात एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुलगी राजा हिंदुस्तानी सिनेमातील ‘तेरे इश्क मै नाचेंगे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
संदीप सहवाग या फेसबुक यूजर्सने हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केला असून, त्यानं म्हटलंय की, “गुरुग्रामच्या पटौदी शहरातील हेलमंडीमध्ये एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेण्डच्या घराबाहेर डीजे लावून, डान्स केला. बॉयफ्रेण्डने धोका दिल्याने, तिने ही कृती केली.”
सोशल मीडियावर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. पण याची कुणीही सत्यता पडताळलेली नाही. पण हा व्हिडीओ खरा असल्याचं समजून अनेक फेसबुक यूजर्स आपपल्या मित्रांना टॅगही करत आहेत.
जळपास चार हजारपेक्षा जास्त यूजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला असून, अजून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण अद्याप हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement