एक्स्प्लोर
गिरीश कर्नाड यांच्यासह चार विचारवंत निशाण्यावर होते!
गिरीश कर्नाड यांच्यासह बीटी ललिता नाईक, निदुमामिडी मठाचे वीरभद्र चन्नामला स्वामी आणि विचारवंत सीएस द्वारकानाथ यांचाही संशयितांच्या हिटलिस्टमध्ये समावेश होता.
बंगळुरु : गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांच्या हिटलिस्टवर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांच्यासह अनेक साहित्यिक तसंच विचारवंत होते. विशेष तपास पथक अर्थात SIT ने केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.
गिरीश कर्नाड यांच्यासह बीटी ललिता नाईक, निदुमामिडी मठाचे वीरभद्र चन्नामला स्वामी आणि विचारवंत सीएस द्वारकानाथ यांचाही संशयितांच्या हिटलिस्टमध्ये समावेश होता.
गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकानं सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, के टी नवीन, अमोल काळे उर्फ भाईसाहेब, अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीफ, मनोहर इडावे आणि परशुराम वाघमारे या सहा जणांना अटक केली आहे.
एसआयटीला या संशयित आरोपींकडून हस्तलिखितांच्या नोंदी असलेल्या तीन डायऱ्या मिळाल्या आहेत. यामध्ये सांकेतिक भाषांचा वापर केला आहे. तर गिरीश कर्नाड, बीटी ललिता नाईक यांच्यासह चार जणांची हिंदीत नाव लिहिलेली आहेत. या चौघांनीही कट्टर हिंदुत्ववादाविरोधात भूमिका घेतली होती.
दरम्यान, अटकेत असलेला 26 वर्षीय परशुराम वाघमारे हा गौरी लंकेश यांचा मारेकरी असू शकतो. कारण त्यांची शरीरयष्टी ही हत्येशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीशी मिळतीजुळती आहे. तसंच तो हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement