Gautam Adani Top 10 Richest Person : भारताच्या उद्योगपतींचा डंका जगभर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत तुम्ही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव पाहिले असेल, परंतु आता गौतम अदानी यांनी त्यांना मागे टाकले आहे. अदानी यांची संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. एवढेच नाही तर जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचे नावही सामील झाले आहे.
शंभर अब्जाधीशांच्या यादीत सामील
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. यासह अदानी आता अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. शंभर अब्जाधीश म्हणजे ज्यांची संपत्ती 100 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. अशाप्रकारे आता अदानी एलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांच्यासोबत अब्जाधीशांच्या यादीमध्ये सामील झाले आहेत. या यादीत सामील होणारे अदानी हे दुसरे भारतीय उद्योगपती आहेत. त्यांच्या आधी रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी यांचे नाव या यादीत जोडले गेले आहे.
जगातील श्रीमंत व्यक्तींची क्रमवारी
ब्लूमबर्गच्या ताज्या आकडेवारीनुसार, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे 273 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या खालोखाल अॅमेझॉनचे जेफ बेझोस आहेत, ज्यांची संपत्ती 188 डॉलर अब्ज आहे. या यादीत फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 148 अब्ज डॉलर आहे.
बिल गेट्स 133 अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर, वॉरन बफे 127 अब्ज डॉलरसह पाचव्या क्रमांकावर, 125 अब्ज डॉलरसह लॅरी पेज सहाव्या क्रमांकावर, 119 अब्ज डॉलर्ससह सातव्या क्रमांकावर सर्जी ब्रिन, 108 अब्ज डॉलरसह आठव्या क्रमांकावर स्टीव्ह बाल्मर, 103 अब्ज डॉलर्ससह लॅरी एलिसन नवव्या क्रमांकावर आहेत. 100 अब्ज डॉलर्ससह गौतम अदानी 10 व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर मुकेश अंबानी 99 अब्ज डॉलर्ससह 11व्या क्रमांकावर आहेत. फेसबुकचा मार्क झुकरबर्ग 85 अब्ज डॉलर्ससह 12 व्या क्रमांकावर आहे.
यावर्षी 24 डॉलर अब्ज मालमत्ता वाढली
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात 24 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अदानी या वर्षातील जगातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या उद्योगपतींपैकी एक आहे. अदानी कॉलेज ड्रॉपआउट आहेत. गेल्या 2 वर्षात त्यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. ग्रीन एनर्जीशी संबंधित त्यांच्या कंपनीचा व्यवसाय वेगाने पसरत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मानवांची नग्न छायाचित्रे अंतराळात पाठवणार, एलियन्सना आकर्षित करण्यासाठी शास्त्रज्ञांची कल्पना
- Viral Video : शेजाऱ्यांकडून खाऊ मिळण्यासाठी कुत्र्याचा क्यूट डान्स, पाहा व्हिडीओ
- Viral Video : फ्रीजमधून केलेली चोरी पकडल्यावर थरथर कापू लागला कुत्रा, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha