Bhuvan Bam Automatic Gaadi Video : प्रसिद्ध यूट्यूबर (YouTuber) भुवन बामच्या (Bhuvan Bam) 'ऑटोमॅटिक गाडी' (Automatic Gaadi) या नवीन व्हिडीओवरून वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये महिलांचा अपमान करण्यात आला असून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. यावर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता भुवनने नव्या व्हिडीओमुळे अनेकाच्या भावना दुखावल्या गेल्याने सर्वांची माफी मागितली आहे. भुवनने म्हटले आहे की, त्याचा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तसेच या व्हिडीओतील वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आल्याचे आश्वासनही त्याने दिलं आहे.


भुवनने ट्विटरवर सार्वजनिक माफीनामा जारी करताना लिहिले आहे की, 'मला माहिती आहे की माझ्या व्हिडीओच्या एका भागामुळे काही लोक नाराज झाले आहेत. तो भाग काढून टाकण्यात आला आहे. जे मला ओळखतात त्यांना माहित आहे की मला महिलांबद्दल खूप आदर आहे. कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. ज्यांच्या भावना दुखावला गेला आहे त्यांची मी मनापासून माफी मागतो.


भुवन बामवर एफआयआर नोंदवण्याची मागणी
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) दिल्ली पोलिसांना या व्हिडीओसाठी भुवन बाम विरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सोशल मीडियावर म्हटले आहे की, आम्ही संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणी दिल्लीच्या पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचा भंग करणाऱ्या यूट्यूब चॅनलवर योग्य ती कारवाई करण्यासाठी आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha