नवी दिल्ली : जी-20 परिषदेच्या (G-20 Summit) पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. पण यामुळे दिल्लीच्या (Delhi) रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय. त्यामुळे जी-20 परिषदेच्या दरम्यान दिल्ली पूर्णपणे बंद राहणार का? असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं दिल्ली पोलिसांनी एकदम हटके अंदाजात उत्तर दिलं आहे. ट्वीट करत दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे की, जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये लॉकडाऊन (LockDown) लावण्याची काही गरज नाही. पण दिल्ली पोलिसांनी हेच उत्तर वेगळ्या पद्धतीने दिलं आहे. त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 


दिल्ली पोलिसांचं ट्वीट नेमकं काय?


पोलिसांनी दक्षिण भारतीय चित्रपट डॉन नंबर 1 मधील एका संवादाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जी-20 परिषदेदरम्यान दिल्लीमध्ये लॉकडाऊन लागणार नाही. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "दिल्लीकरांनो, अजिबात घाबरु नका. कोणताही लॉकडाऊन लागणार नाही. फक्त ट्रॅफिकच्या संबंधी अपडेट घेण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या व्हर्च्युअल हेल्प डेस्कशी संपर्क साधा."







कोणत्या मार्गाने कराल प्रवास?


दिल्ली वाहतूक पोलिसांनी जी-20 परिषदेदरम्यान दिल्लीमध्ये रीअल-टाईम ट्रॅफिक माहितीसाठी  हेल्पडेस्क तयार केला आहे. कोणत्या मार्गाने प्रवास करायचा किंवा कोणत्या मार्गाने प्रवास करणं सोप जाईल यासंदर्भातली माहिती हा हेल्पडेस्क देणार आहे. दरम्यान ज्या परिसरामध्ये परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्या परिसरात जाणं टाळावं, असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. 


उत्तर - दक्षिण मार्ग


रिंग रोड - आश्रम चौक - सराय काले खान - दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे - नोएडा लिंक रोड - पुस्ता रोड - युधिष्ठिर सेतू - आईएसबीटी काश्मीर गेट - याशिवाय एम्स चौक - रिंग रोड - धौला कुआँ - रिंग रोड - ब्रार स्क्वेअर - नारायण फ्लायओव्हर - राजौरी गार्डन जंक्शन - रिंग रोड - पंजाबी बाग जंक्शन - रिंग रोड - आझादपूर चौक या मार्गाने प्रवास करता येणार आहे. 


पूर्व - पश्चिम मार्ग


सन डायल/डीएनडी फ्लायओव्हर ते-रिंग रोड-आश्रम चौक-मूलचंद अंडरपास-एम्स चौक-रिंग रोड-धौला कुआँ-रिंग रोड-बरार स्क्वेअर-नारायणा फ्लायओव्हर हे मार्ग वाहतूकीसाठी खुले राहणार आहेत. युधिष्ठिर सेतू - रिंग रोड - चांदगी राम आखाडा - मॉल रोड - आझादपूर चौक - रिंग रोड - लाला जगत नारायण मार्ग हे मार्ग सुद्धा वाहतूकीसाठी उपलब्ध असणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


G20 Summit: भारतात येणाऱ्या पाहुण्यांसाठी शाही थाट; रस्त्यांपासून ते हॉटेलपर्यंत तयारी पूर्ण