भारत : राजधानी दिल्लीसह (Delhi) देशातील काही भागांमध्ये उष्णेतची लाट कायम राहणार आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता देखील भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून ओदिशा, तेलंगणा, केरळच्या विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर दिल्लीकरांना सध्या तरी उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. तसेच, येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तर सोमवार 4 सप्टेंबर रोजी कमाल आणि किमान तापमान हे क्रमश: 37 आणि 27 अंश सेल्सियस असणार असल्याचा अंदाज हवामान विभाकडून देण्यात आला आहे. 


उत्तर प्रदेशात पावसाचा अंदाज


भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागामध्ये 4 सप्टेंबरपर्यंत वातावरण कोरंड राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये 5 सप्टेंबरनंतर मान्सून वेगाने सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच, 5 आणि  6 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील पश्चिम भागांमध्ये काही शहरांत हलका पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर पूर्व भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.  


कुठे कुठे होईल पाऊस?


उत्तर प्रदेशासह उत्तराखंडच्या मैदानी भागामध्ये काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहिल. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 6 सप्टेंबरपर्यंत  बागेश्वर, पिथौरागड, अल्मोडा आणि चंपावत जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. तर दुसरीकडे हवामान विभागाने ओडिशा, छत्तीसगडमधील पुढचे पाच दिवस मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाच वर्तवण्यात आलायं. पाच सप्टेंबरपासून ईशान्य भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलंय. 


महाराष्ट्रात पावसाची शक्यता


राज्यात पुढील पाच ते सात दिवस मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तर .येच्या 48 तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. 


आसामध्ये पूरस्थिती


आसाम राज्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून  583 गावं पाण्याखाली आहेत. तर आसाममधील सात राज्यांमध्ये पूरस्थिती अजूनही कायम आहे. या पुराचा सर्वात जास्त फटका हा दररंग जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यामध्ये  60 हजार 600 अधिक लोकांचे या पुरामुळे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुत्रा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. 


जुलैमध्ये समाधनकारक पाऊस पडल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने चांगलीच विश्रांती घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट ओढावले आहे. देशांतील अनेक राज्यांमध्ये अद्यापही शेतीपुरक समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Assam Flood: आसाममधील काही भागांत पूरस्थिती कायम, 583 गावं अजूनही पाण्याखालीच; 1.22 लाख लोकांना फटका