Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतींत किंचित वाढ झाली आहे. WTI क्रूड 0.27 डॉलरनं वाढून प्रति बॅरल 85.82 डॉलरवर विकलं जात आहे. तसेच, ब्रेंट क्रूड 0.17 डॉलरर्सच्या वाढीसह प्रति बॅरल 88.72 डॉलरवर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. देशात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.


महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पेट्रोलच्या दरात 1.01 रुपयांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर डिझेलच्या दरातही 97 पैशांची कपात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 45 पैशांनी स्वस्त झाले आहे. त्याचप्रमाणे राजस्थान, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी वाढले आहे. झारखंडमध्ये पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी वाढले आहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 18 पैशांनी वाढ झाली आहे.


देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेल स्थिर 



  • दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर (Delhi Petrol Diesel Price)

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर (Mumbai Petrol Diesel Price)

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 


दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).