(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Piyush Goyal : विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करार हाच मोदी सरकारचा अजेंडा : पियूष गोयल
विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करार हा मोदी सरकारचा (Modi Government) महत्त्वाचा अजेंडा असल्याचे मत केंद्रीय वस्त्रोद्योग आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी व्यक्त केले.
Piyush Goyal : विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करार हा मोदी सरकारचा (Modi Government) महत्त्वाचा अजेंडा असल्याचे मत केंद्रीय वस्त्रोद्योग आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी व्यक्त केले. मुक्त व्यापार करार यशस्वी होण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्राला महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची असल्याचेही ते म्हणाले. पुढील दशकासाठी वस्त्र आणि परिधान उद्योगाची पुनर्कल्पना' या विषयावर दहाव्या आशियाई वस्त्रोद्योग परिषदेचे आयोज करण्यात आले होते. यावेळी पियूष गोयल बोलत होते. विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करार (Free Trade Agreements) हे मोदी सरकारच्या विषयपत्रिकेवरचा मुख्य विषय असल्याचं गोयल यांनी सांगितलं.
वस्त्रोद्योग क्षेत्रातील पुनर्वापरावर लक्ष देण्याचं आवाहन
विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारताच्या वाटचालीत नवोन्मेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी बोलताना गोयल यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रातील सर्व मूल्य साखळ्यांमध्ये नवोन्मेषाची भूमिका अधोरेखित केली. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रात सुरु असलेल्या कामासंदर्भात देखील माहिती दिली. वस्त्रोद्योग क्षेत्रातील पुनर्वापर आणि डिजिटलीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन यावेळी गोयल यांनी केलं. अभिनवता, शाश्वतता, डिजिटलीकरण, नवीन उत्पादने आणि मुक्त व्यापार कराराच्या (Free Trade Agreements) वापरावर आपल्या उद्योग क्षेत्राने भर देणं गरजेचं आहे. तसे केल्यास उद्योग क्षेत्राचा वेगाने विकास होऊ शकतो, त्यामुळं आपण जगातील सर्वोत्तम कंपन्यांशी स्पर्धा करू शकतो, असेही पियूष गोयल यांनी यावेळी सांगितले.
भारतीय वस्त्रोद्योग महासंघाचा इजिप्शियन कॉटनशी सामंजस्य करार
शाश्वत विकासाच्या संदर्भात देखील पियूष गोयल यांनी आपली भूमिका मांडली. पुन्हा वापरता येण्याजोग्या संसाधनांचा वापर करुने गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कारण याद्वारे वस्त्रोद्योग क्षेत्र पर्यावरणावर येणारा ताण कमी करू शकते. तसेच स्वतःचा उत्पादन खर्च कमी करू शकते असे गोयल यांनी यावेळी सांगितले. पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय वस्त्रोद्योग महासंघ (Confederation of Indian Textile Industry)आणि इजिप्शियन कॉटन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही उद्योग संस्था परस्पर फायद्यासाठी एकत्र काम करतील असेही गोयल यांनी यावेळी सांगितले. यावेळी गोयल यांनी व्यापाराच्या संदर्भातील मोदी सरकारचा अजेंडा देखील सांगितला. विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करार हा मोदी सरकारचा महत्त्वाचा अजेंडा असल्याचं त्यांनी सांगितलं. मुक्त व्यापार करार यशस्वी होण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्राला महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची असल्याचेह ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Piyush Goyal : आर्थिक विकासाचं इंजीन म्हणून जगाचं भारताकडं लक्ष, विकसित देश व्यापार करार करण्यास उत्सुक : पियूष गोयल
- देशाची अर्थव्यवस्थेचा आणि RRR चित्रपटाचा काय संबंध आहे? केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले...