जम्मू काश्मीरच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. श्रीनगरमध्येही बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. बर्फवृष्टी आणि पावसामुळे दळणवळण विस्कळीत झालं आहे. तर, बर्फवृष्टीमुळे सगळीकडेच बर्फाची चादर पसरली आहे. श्रीनगरमध्ये सहा इंचांपर्यंत जाडीचा थर तयार झाला आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमधील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. श्रीनगरमध्ये तर तापमान शून्य डिग्रीपर्यंत पोहचले आहे. बर्फवृष्टीमुळे श्रीनगरला ये-जा करणाऱ्या अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये आजही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
- सातारचा वीरपुत्र शहीद संदीप सावंत यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप
- शहीद पित्याला चिमुकल्याचा कडक सॅल्यूट, दृश्य पाहून उपस्थित गहिवरले
- आता शहीद जवानांच्या कुटुंबाला 25 लाखांऐवजी एक कोटींची मदत
Karad | शहीद संदीप सावंत यांच्यावर आज अंत्यसंस्कार | ABP Majha