सातारा : काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेल्या कराड तालुक्यातील संदीप सावंत यांच्यावर त्यांच्या मुंढे या मूळ गावी लष्करी इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. अवघे 25 वर्षे वय असलेस्या शहीद संदीप यांच्यामागे पत्नी सविता आणि एक दीड महिन्यांची मुलगी, आई-वडील असे कुटुंब आहे. शहीद संदीप यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा पंचक्रोशीतील जनतेने गर्दी केली होती.


संदीप यांचे पार्थिव त्यांच्या घरासमोर दाखल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय यांचा आक्रोश पाहून संपूर्ण जनसमुदाय हळहळताना दिसत होता. पतीचा चेहरा पाहायचाय असा पत्नीने अट्टाहास केल्यानंतर शहिद संदीपचा चेहरा दाखवला गेला आणि पत्नी जमिनीवर कोसळली. ही सर्व दृश्य मन पिळवटून टाकणारी होती. त्यानंतर संदीप यांचे पार्थिव त्यांच्याच शेतात उभारण्यात आलेल्या चबूतऱ्याजवळ आणण्यात आले. लष्कराने सलामी दिल्यानंतर संदीप यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला.

हेही वाचा - शहीद पित्याला चिमुकल्याचा कडक सॅल्यूट, दृश्य पाहून उपस्थित गहिवरले

जम्मू-काश्मीरमध्ये दोन जानेवारीला पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत सातारच्या जवान वीरमरण आलं होतं. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना संदीप सावंत शहीद झाले. शहीद संदीप सावंत हे कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवाशी आहेत. संदीप यांचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता. त्यांना अवघ्या दोन महिन्यांची मुलगी आहे. संदीप सावंत शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण मुंढे गावावर शोककळा पसरली आहे.

संदिप सावंत यांचे मोठे भाऊ शशिकांत सावंत यांना सकाळी दहा वाजता फोन आला आणि संदिप सावंत यांना सीमेवर लढताना तीन ते चार गोळ्या लागल्या असल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांच्या शशिकांत यांनी संदिप यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद होता. त्यानंतर शशिकांत यांनी माहिती मिळवली तेव्हा सुरज यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचे भाऊ संदिप हे शहिद झाल्याचे त्यांना समजले. संदिप यांना अवघ्या दोन महिन्याची मुलगी रिया आहे. नववर्षाच्या दुसऱ्याच वर्षी ही घटना घडल्याने सावंत कुटुंबासोबत संपूर्ण मुंढे गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - आता शहीद जवानांच्या कुटुंबाला 25 लाखांऐवजी एक कोटींची मदत

Satara | दोन महिन्यांची लेक पोरकी, नौशेरामधील चकमकीत साताऱ्याचे जवान संदीप सावंत शहीद | ABP Majha