नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नवीन विषाणूची (स्ट्रेन) लागण झालेल्या लोकांची संख्या वाढून आता 33 झाली आहे. ब्रिटनहून गुजरातला परत आलेल्या चार जणांना नवीन कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या चार जणांचे नमुने पुण्याच्या व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठविण्यात आले होके. सध्या 15 सँपल्स नमुन्यांचे निकाल प्रलंबित आहेत. त्याचे अहवाल सहा दिवसात येणे अपेक्षित आहे.


गुजरातचे आरोग्य सचिव जयंती रवी म्हणाले की, ज्यांना संसर्ग झालेला आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याचेही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. जे लोक त्यांच्याबरोबर प्रवाशी विमानाने आले होते त्यांना वेगळे केले जात आहे.


आतापर्यंत कुठे किती नव्या स्ट्रेनचे रुग्ण?

  • एनसीडीसी दिल्ली - 8

  • NIMHANS बँगलोर - 10

  • NIV पुणे - 9

  • आयजीआयबी दिल्ली - 2

  • सीसीएमबी हैदराबाद - 3

  • एनआयबीएमजी कल्याणी- 1


भारत ते ब्रिटनदरम्यान उड्डाण सेवा 6 जानेवारीपासून सुरू होणार


भारतातून ब्रिटनसाठी उड्डाण सेवा सहा जानेवारीपासून पूर्ववत करण्यात येणार आहे, तर ब्रिटनहून भारतासाठी विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होईल. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शनिवारी ट्विट केले की, "भारत आणि ब्रिटन दरम्यान उड्डाणांना लवकर सुरुवात होणार. 6 जानेवारीला भारततून तर ब्रिटनमधून 8 जानेवारीला दर आठवड्याला 30 उड्डाणे 15 भारतीय विमान कंपन्या आणि तितक्याच ब्रिटीश कंपन्यांद्वारे सुरु होतील. "ते म्हणाले," हा कार्यक्रम 23 जानेवारी 2021 पर्यंत सुरु राहिल. आढावा घेतल्यानंतर पुढील गोष्टींवर विचार केला जाईल."


पुरी यांनी शुक्रवारी जाहीर केले की 8 जानेवारी रोजी भारत आणि ब्रिटन दरम्यान उड्डाण सेवा पुन्हा सुरू झाल्यावर दर आठवड्याला फक्त 30 उड्डाणे चालविली जातील आणि ही व्यवस्था 23 जानेवारीपर्यंत सुरू राहील. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सुरू झाल्यानंतर 23 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत भारताने दोन्ही देशांमधील सर्व प्रवासी उड्डाणे थांबविली आहेत.


संबंधित बातमी
सर्व भारतीयांना नाही तर फक्त 'यांनाच' मोफत लस!, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण


Exclusive : 'भारतात येत्या काही दिवसांत 2-3 लसींना मान्यता मिळेल', CSIR महासंचालकांचं मत


Corona Vaccine Cost | संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत : आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन