मुंबई : कोरोना व्हायरस शनिवारी रात्री महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरापर्यंत पोहोचला आणि एकच खळबळ उडाली. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी स्वत: शनिवारी ट्वीटरवरुन सर्वांना सांगितलं. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली कळताच, देश-विदेशातून ते लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे फॅन्स प्रार्थना करु लागलेत. अनेकांनी सोशल मीडियावर बिग बी लवकरच कोरोनावर मात करुन चाहत्यांसमोर येतील ही सदिच्छा व्यक्त केली.
पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरनेही अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली. पाकिस्तानातील तुमचे चाहते तुमच्यासाठी प्रार्थना करतायेत असं शोएबने म्हटलं. शोएब अख्तरने अमिताभ बच्चन यांचं ट्वीट रिट्वीट करत म्हटलं की, "अमितजी लवकर बरे व्हा. तुम्ही लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना."
ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण
बिग बी आणि अभिषेक बच्चन नंतर आज दुपारी इतरांचे कोविड 19 टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या देखील कोविड पॉझिटिव्ह आल्या. बिग बी आणि अभिषेक बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणं आहेत, मात्र दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे.
तर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांच्यात कोरोनाची लक्षणं नाहीत. त्यामुळे दोघींना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसल्याचं बीएमसीने सांगितलं. त्यामुळे ऐश्वर्या आणि आराध्या होम क्वॉरंटाईन आहेत.
संबंधित बातम्या
- बिग बी अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चनची प्रकृती स्थिर, काळजीचं कारण नाही
- Abhishek Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यानंतर मुलगा अभिषेक बच्चन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
- लॉकडाऊन काळात बिग बी अमिताभ यांचं घरुन शूट, KBC सह काही जाहिरातींचं चित्रिकरण