विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी कमल बाबू हा अवघा 19 वर्षांचा असून तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्याने त्याच्या संपर्कातील लोकांच्या मदतीने एसबीआयची शाखा सुरू करण्यासाठी संगणक, लॉकर, चालान आणि बनावट कागदपत्रे आणली होती. पनरुती बाजार शाखेच्या नावावर एक वेबसाइट देखील तयार केली आहे.
बाबू याने साथीदार ए कुमार (वय 42) आणि एम मण्णीकम (वय 52) यांच्या मदतीने एप्रिल महिन्यात शाखा उघडली. लॉकडाऊनमध्ये आपल्याला कोणी पकडणार नाही, असा त्यांचा समज होता.
कर्जाच्या हफ्त्यांसाठीचा बँकांनी दिलेला दिलासा पडू शकतो 'महागात'!
ग्राहकामुळे बँकेचा भांडाफोड
एसबीआयच्या एका ग्राहकाने उत्तर बाजारपेठेत नव्याने उघडलेल्या शाखेची माहिती शहरातील विद्यमान शाखेच्या व्यवस्थापकाला विचारल्यानंतर ही शाखा रडारवर आली. डुप्लीकेट शाखेतून घेतलेली पावती एका ग्राहकाने दाखवल्यानंतर मॅनेजर आणि इतर अधिकारी बनावट शाखेत गेले. तिथे मूळ बँकेच्या शाखाप्रमाणेच सेट पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पररुती पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 473, 469, 484, 109 अन्वये अटक करण्यात आली.
Wadhwan Property Seized | वाधवान बंधूंची 1411कोटींची संपत्ती जप्त, येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी कारवाई