Lalu Yadav Admitted in AIIMS: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना ताप असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव गुरुवारी पाटण्याहून दिल्लीला परतले होते. त्यानंतर बुधवारी त्यांनी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित केलं होतं. त्याच दिवशी लालू प्रसाद यादव हे त्यांची पत्नी माजी मुख्यमंत्री राबडी देवीसह यांच्या निवासस्थानाच्या आसपासच्या रस्त्यांवर जीप चालवताना दिसले होते. मात्र, त्यांना आज ताप आल्यानं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. लालू प्रसाद यादव हे किडनी, हृदय आणि इतर आजारांनी ग्रस्त आहेत. 73 वर्षीय लालू प्रसाद यादव यांचा अंदाज पाहून त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी 'लालू यादव जिंदाबाद' अशा घोषणाबाजी केल्या.
गुरुवारी दिल्लीला जाण्यापूर्वी पाटणा विमानतळावर लालू यादव यांनी नीती आयोगाच्या अहवालाबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला होता. लालू यादव म्हणाले होते की, "नीती आयोगाच्या अहवालात म्हटले आहे की, राज्य शिक्षणासह आरोग्य व्यवस्थेपर्यंत मागे पडलंय. विकासची घोषणा देणाऱ्यांनी नीती आयोगाचा अहवाल पाहावं, असंही लालू यादव म्हटलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- 'तारीख पे तारीख'मधून सुटका? खटल्यांच्या सुनावणीसाठी कालावधी निश्चित करण्याची वेळ : सर्वोच्च न्यायालय
- बांधावरचे वाद मिटेनात, संपत्तीचे कसे मिटणार, मुकेश अंबानींनी संपत्ती वाटपाची भन्नाट ट्रिक शोधली
- भ्रष्टाचार प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींवर खटला चालवण्याची CBI ला परवानगी
- देशभरात लवकरच डिजिटल बँका सुरु होणार, शाखा नसणार; नीती आयोगाकडून प्रस्ताव सादर