High Court Judge in Corruption Case : सीबीआयनं (CBI) प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लखनौमधील न्यायालयीन भ्रष्टाचार प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एसएन शुक्ला यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. अखेर ही परवानगी सीबीआयला मिळाली आहे. दरम्यान, जुलै 2020 मध्ये निवृत्त झालेल्या न्यायमूर्ती शुक्ला यांच्यावर संस्थेच्या बाजूने आदेश देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 


अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. एन. शुक्ला आणि ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आयएम कद्दुसी यांनी प्रसाद एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज रद्द केल्याच्या प्रकरणात दिलासा देण्यासाठी ट्रस्टकडून लाच घेण्याचा प्लॅन केला होता. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मे 2017 मध्ये या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास प्रतिबंध केला होता. प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसला खराब सुविधा आणि आवश्यक निकषांची पूर्तता न केल्यामुळे दोन वर्षांसाठी (2017-19) वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.


केंद्रीय तपास संस्थेने एफआयआर नोंदवल्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये शुक्ला यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हा एसएन शुक्ला न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. या प्रकरणातील तज्ज्ञांच्या मते, न्यायमूर्ती शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मंजुरी मागवण्यात आली होती. आरोपपत्र लवकरात लवकर दाखल करता यावं म्हणून सीबीआयनं एसएन शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यासाठी अलाहाबाद हायकोर्टाकडे परवानगी मागितली होती. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तपास पूर्ण झाला असून खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे सीबीआयकडे आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :