Coronavirus Botswana Variant : दक्षिण अफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं आता जगभर चिंता वाढली आहे आणि याचेच परिणाम भारतीय बाजारातही दिसून आलं आहे. शेअर बाजारात आज 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स तब्बल 1700 अंकांनी पडला तर निफ्टी 500 हून अधिक अंकांनी पडला.
काल अमेरिकन बाजारातही पडझड पाहायला मिळाली आणि याचेही परिणाम आज भारतीय बाजारात दिसून आले. मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आज बाजार सुरू होताच निर्देशांकात 800 अंकांची घसरण झाली, त्यानंतर आणखी घसरण होऊन निर्देशांक 1400 अंकांनी खाली आला. तर निफ्टीचा निर्देशांक आज 200 अंकांनी घसरला.
एकंदरीतच आता दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटची चिंता भारतासह जगभरात दिसून येतेय. तर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना पत्र लिहून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं तर बाहेरुन येणाऱ्यांची चाचणी करण्याचेही निर्देश दिले आहेत.
कोणत्या व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ?
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे नाव B.1.1.529 आहे. याला 'बोत्सवाना व्हेरिएंट'ही म्हटले जाते. आफ्रिकन खंडातील देश बोत्सवानामध्ये हा व्हेरिएंट आढळला. दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीजने या व्हेरिएंटला दुजोरा दिला आहे. बी.1.1.529 व्हेरिएंटचा संसर्ग एका रुग्णाद्वारे फैलावला असल्याचे म्हटले जात आहे. लंडन येथील युसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक फ्रॅक्वा बेलॉस यांनी म्हटले की, हा व्हेरिएंट एखाद्या गंभीर आजाराशी दोन हात करणाऱ्या रुग्णापासून तयार झाला आहे. या रुग्णाला एचआयव्ही/एड्स असण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे
Delta Plus : डेल्टा प्लस व्हेरिएंट 'चिंताजनक' घोषित, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळला केंद्र सरकारचा अलर्ट
New Coronavirus Variant : कोरोना रुग्णांचं वजन घटवणारा नवा व्हेरिएंट भारतात