एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

लालूंना प्रचारासाठी तुरुंगाबाहेर पडता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी तुरुंगाबाहेर पडण्याचे राष्ट्रीय जनता दलचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची इच्छा अपूर्ण राहणार आहे.

नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी तुरुंगाबाहेर पडण्याचे राष्ट्रीय जनता दलचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची इच्छा अपूर्ण राहणार आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या लालू यांनी प्रकृतीचे कारण देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत लालू यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सीबीआयने कोर्टाला सांगितले की, आरोग्य ठिक नसल्याचे नाटक करुन लालू यादव रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमधून राजकीय कामं करत असतात. तिथे ते अनेक मोठ्या नेत्यांना तसेच प्रभावशाली व्यक्तींना भेटत असतात. ज्या आजारांचा संदर्भ लालू नेहमी देतात, ते आजार फार मोठे नाहीत. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु आहेत. या सर्व गोष्टी पुरवल्यानंतरही लालू आजारपणाचे ढोंग करत निवडणूक काळात तुरुंगाबाहेर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे गेल्या 8 महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात राहण्यासाठी लालूंना विशेष सुविधा पुरवली जात आहे. शिवाय त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने लालूंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. लालू यांना एकूण चार प्रकरणांमध्ये शिक्षा मिळाली आहे. त्यांना तब्बल 27 वर्ष सहा महिन्यांची शिक्षा झाली असून त्यापैकी 20 महिन्यांची शिक्षा लालूंनी भोगली आहे. परंतु त्यापैकी बराच काळ त्यांनी आजारपणाच्या नावाखाली रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमध्ये घालवला आहे. लालूप्रसाद हे सध्या चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे लालू यादव 1977 नंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget