(Source: ECI | ABP NEWS)
Flight Lieutenant Siddharth Yadav : फायटर जेटची दिशा बदलून लोकांचे प्राण वाचवले, पण फ्लाइट लेफ्टनंट 28 वर्षीय सिद्धार्थ शहीद; अवघ्या 10 दिवसांपूर्वीच साखरपुडा
हा अपघात जामनगर शहरापासून 12 किमी अंतरावर असलेल्या सुवर्णा गावाजवळ 2 एप्रिल रोजी रात्री 9:30 च्या सुमारास झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान जमिनीवर आदळले आणि आग लागली.

Flight Lieutenant Siddharth Yadav : गुजरातमधील जामनगरमध्ये बुधवारी रात्री भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान प्रशिक्षण उड्डाण दरम्यान कोसळले. या अपघातात 28 वर्षीय फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव शहीद झाले. सिद्धार्थ हरियाणातील रेवाडी येथील आहेत. सिद्धार्थ यांची 10 दिवसांपूर्वीच एंगेजमेंट झाली होती. नोव्हेंबरमध्ये ते लग्न करणार होते. काही दिवसांपूर्वी ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रेवाडीत आले होते. 31 मार्च रोजी ड्युटीवर परतला होता. आज शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांचे पार्थिव रेवाडीला पोहोचणार आहे. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शेवटच्या क्षणी सिद्धार्थ यादव आणि त्याच्या सहवैमानिकाने विमानाची दिशा बदलून लोकांचे प्राण वाचवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सहवैमानिकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातात सिद्धार्थ यांना जीव गमवावा लागला.
गुजरातमधील जामनगरमध्ये अपघात
हा अपघात जामनगर शहरापासून 12 किमी अंतरावर असलेल्या सुवर्णा गावाजवळ 2 एप्रिल रोजी रात्री 9:30 च्या सुमारास झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान जमिनीवर आदळले आणि आग लागली. मलबा दूरवर पसरला. स्थानिक लोकांनी तातडीने घटनास्थळ गाठून प्रशासनाला माहिती दिली.
सिद्धार्थचे आजोबा आणि पणजोबाही सैन्यात
फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव हे लष्करी कुटुंबातील होते. त्यांचे आजोबा ब्रिटीश काळात पायलट ट्रेनिंग ग्रुप बंगाल इंजिनिअर्समध्ये होते. आजोबा निमलष्करी दलात तर वडील सुजित यादव भारतीय हवाई दलात आहेत. पुढे त्यांचे वडील एलआयसीमध्ये रुजू झाले. गणवेश परिधान करून देशसेवा करणारा सिद्धार्थ या कुटुंबातील चौथी पिढी होती. 2016 मध्ये एनडीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण घेतले आणि नंतर फायटर पायलट बनले. दोन वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी फ्लाइट लेफ्टनंटची रँक प्राप्त केली.
वडील म्हणाले, सिद्धार्थचे नेहमीच देशसेवेचे स्वप्न होते
सिद्धार्थच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब आणि शहरावर शोककळा पसरली आहे. वडील सुजित यादव म्हणाले की, सिद्धार्थचे नेहमीच विमान उडवून देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते. तो अभ्यासातही हुशार होता. माझे वडील आणि आजोबाही सैन्यात होते. मी स्वतः हवाई दलात राहिलो आहे. याचा आम्हाला नेहमीच अभिमान होता आणि आजही आहे. पण तो माझा एकुलता एक मुलगा होता याचेही वाईट वाटते.
हवाई दलाने सांगितले, शेवटच्या क्षणी शहाणपण आणि शौर्य दाखवले
हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, हे जग्वार फायटर जेट जामनगर एअरफील्डवरून रात्रीच्या मोहिमेवर निघाले होते. उड्डाण करताना वैमानिकांना तांत्रिक बिघाड झाला. आयएएफने सांगितले की, वैमानिकांनी त्रुटी ओळखून इजेक्शन प्रक्रिया सुरू केली. विमानाने लोकवस्तीच्या भागात कोणतेही नुकसान होऊ नये, असेही ठरविण्यात आले. यादरम्यान एक पायलट शहीद झाला, तर सहवैमानिकावर उपचार सुरू आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























