एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लडाखमध्ये हिमस्खलनात 5 जवान गाडले, दोन शहीद, एक बेपत्ता
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे पाच जवान गाडले गेले असून त्यापैकी दोन जवान शहीद झाले आहेत, तर एक बेपत्ता आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे तीन नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत.
लडाखच्या बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे पाच जवान गाडले गेले होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं असून दोन जवान शहीद झाले आहेत. एका जवानाचा अद्याप शोध लागलेला नाही.
दुसरीकडे, झेलम नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सैन्यदलाच्या वतीनं बचावकार्य सुरु असून तीन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या जम्मू काश्मीरचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भूस्खलनामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गही बंद पडला आहे.
जम्मू काश्मिरमधील शाळांनाही रविवारपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. रस्त्यांवरच सर्वत्र बर्फ पसरलेला पाहायला मिळत आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही अवघड झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट
शेत-शिवार
Advertisement