एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धावत्या ‘रोरो’ रेल्वेतील ट्रकला भीषण आग
‘रोरो’ रेल्वेतून नेण्यात येणाऱ्या एका ट्रकला गोव्याजवळी मये येथे आग लागली. या आगीत ट्रकचा समोरील भाग जळून खाक झाला आहे.
डिचोली (गोवा) : ‘रोरो’ रेल्वेतून नेण्यात येणाऱ्या एका ट्रकला गोव्याजवळी मये येथे आग लागली. या आगीत ट्रकचा समोरील भाग जळून खाक झाला आहे.
पण रेल्वे चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच रेल्वे थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, रेल्वे कर्मचारी व डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. सुमारे 15 किमीपर्यंत पेटत्या ट्रकसह धावणारी रेल्वे पाहून अनेकांना ‘बर्निंग ट्रेन’चा अनुभव घेतला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सदर रोरो रेल्वे पनवेल-मुंबई येथून सुमारे 40 अवजड ट्रक घेऊन कर्नाटककडे निघाली होती. परंतु मये येथे ट्रेन येताच एका लोखंडी प्लेटस् भरलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अचानक आग लागली. ज्यात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
आग लागताच रेल्वेतील ट्रक चालकांची एकच धावपळ उडाली. आग लागलेल्या ट्रक चालकाने रांगेत असलेल्या ट्रकवरून धाव घेत रेल्वे चालकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून नार्वे येथे पोहोचण्यापूर्वीच रेल्वे थांबविली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताचा अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ट्रकचे केबिन व इंजिन जळून खाक झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement