एक्स्प्लोर

जप्त केलेल्या सर्व नव्या नोटा चलनात : शक्तिकांत दास

नवी दिल्ली : देशातील नव्या नोटांचा तुटवडा टाळण्यासाठी युद्धपातळीवर नव्या पाचशे आणि दोन हजारच्या नोटांची छपाई सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. देशात दोन लाख 20 हजार एटीएम आहेत. यापैकी दोन लाखांहून जास्त एटीएम्सचं रिकॅलिब्रेशन आतापर्यंत पूर्ण झालं आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल, असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं. 20, 50, 100 रुपयांच्या नोटांची छपाईही वेगाने सुरु आहे. शंभर रुपयांच्या 80 हजार कोटी किंमतीच्या नोटा बाजारात आहेत. यामुळे बाजारातील सुट्ट्या पैशांचा तुटवडा दूर होईल. तसेच दोन हजारच्या नोटेचे सुट्टे मिळण्यास मदत होईल, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. जप्त केलेल्या नोटांचं काय? देशभरात विविध ठिकाणी आयकर विभाग, पोलिस यांच्या कारवाईदरम्यान कोटींचं घबाड मिळत आहे. यामध्ये नव्या 2 हजारच्या नोटाही अनेक ठिकाणी आढळल्या आहेत. या जप्त केलेल्या नोटा देखील वापरात आणल्या जात आहेत, अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. पाचशेच्या नोटांचा पुरवठा वाढवणार : दास दोन हजारच्या नोटा बाजारात पोहचल्या आहेत. मात्र अजूनही पाचशेच्या नोटेचं अनेकांना दर्शन झालं नाही. त्यामुळे पाचशेच्या नोटा अधिक छापण्यावर भर दिला जात असल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. या नोटा दोन ते तीन आठवड्यात बाजारात येतील. नोटांचा पुरवठा करण्यासाठी देशभरात विमानाचा वापर केला जात आहे, अशी माहितीही शक्तिकांत दास यांनी दिली. सहकारी बँकांमध्ये चलन पुरवठा वाढवणार : दास अर्थ मंत्रालयाने सहकारी बँकांना मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा बँकांवरील बंदी उठवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती अॅटर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टात दिली आहे. त्यामुळे सहकारी बँकांमध्ये चलन पुरवठा वाढवण्यात येईल, असंही शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Nepal Floods Marathi News: नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 1 हजार 344 जणांचा मृत्यू, 275 भारतीय अजूनही बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती
नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 1 हजार 344 जणांचा मृत्यू, 275 भारतीय अजूनही बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती

व्हिडीओ

Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
Embed widget