एक्स्प्लोर

जपानमधील डायमंड प्रिन्सेसवरील 50 गोमंतकीय खलाशी आज भारतात परतणार

जपानमधील डायमंड प्रिन्सेस या जहाजावरील 50 गोमंतकीय खलाशांना आज विशेष विमानाने भारतात आणले जाणार आहे.

पणजी : जपानमध्ये खोल समुद्रात 'डायमंड प्रिन्सेस' या जहाजावर अडकलेल्या 50 गोमंतकीय खलाशांना इंडियन एअरलाईन्सच्या खास विमानाने भारतात आणले जात असल्याची माहिती अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली आहे. यापूर्वी कोरोनाची औषधं घेऊन चीनमध्ये गेलंलं एक विमान वुहान येथून 119 भारतीय नागरिकांना घेऊन आज परतले आहे. या जहाजावरील खलाशांपैकी 14 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली, त्यांना दिल्ली विमानतळावर आणल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. किमान पुढील 20 ते 25 दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. नंतरच त्यांना आपल्या राज्यात जाऊ दिले जाणार असल्याची माहिती सावईकर यांनी दिली आहे. डायमंड प्रिन्सेस या जहाजावर 124 भारतीय खलाशी अडकले आहेत. त्यात 50 गोमंतकीय असल्याची माहिती मिळताच अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर तसेच जपानमधील भारतीय राजदूत संजय कुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधून त्यांना मायदेशात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नाना यश आले असून काल बुधवारी खास विमानाने हे खलाशी मायदेशी निघाले आहेत. या जहाजावर असलेल्या धनस्थ रायकर या गोमंतकीय खलाशाने विमानात बसल्या नंतरचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. सावईकर यांनी या खलाशांना मायदेशी आणण्यात पूर्ण सहकार्य केल्याने केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर व जपानमधील भारतीय राजदूत संजय कुमार शर्मा यांचे आभार मानले आहेत. Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेश चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं - चीनच्या वुहान प्रांतातून 119 भारतीय आणि पाच परदेशी नागरिकांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान दिल्लीला परतले आहे. चीनला 15 टन साहित्य घेऊन हे विमान बुधवारी रवाना झाले होते. गेल्या 28 दिवसांत कोरोना विषाणू बाधित भागातून भारताने 850​​हून अधिक नागरिकांना सुरक्षित भारतात आणले आहे. भारताने मित्र देशांच्याही 45 हून अधिक नागरिकांना बाहेर काढले आहे. Corona | कोरोना विषयी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget