एक्स्प्लोर
सैफुल्लाह देशद्रोही, मृतदेह स्वीकारण्यास वडिलांचा नकार

लखनऊ : लखनऊत मारला गेलेला दहशतवादी सैफुल्लाहच्या वडिलांनी त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. मुलगा देशद्रोही असल्याचं सांगत त्यांनी हा निर्णय घेतला. सैफुल्लाहला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं, पण त्याने ऐकलं नाही, त्यामुळे तो मारला गेला, अशी माहिती सैफुल्लाहचा भाऊ खालिद याने दिली. 'सैफुल्लाहने आपली कोणतीच गोष्ट ऐकली नाही. सौदीचा व्हिजा झाला असून तिकडे जात असल्याचं सैफुल्लाहने फोनवरुन सांगितलं होतं. देशद्रोही मुलाचा मृतदेह आपण स्वीकारणार नाही', असं दहशतवादी सैफुल्लाहचे वडील सरताज यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊतील ठाकूरगंजमध्ये दहशतवादी सैफुल्ला आणि एटीएसमध्ये तब्बल 11 तास चकमक चालू होती. 11 तासांच्या या चकमकीनंतर दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात एटीएसला यश आलं.
संबंधित बातमी : भारतात पहिल्यांदा आयसिस दहशतवाद्याला कंठस्नान
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?






















