Fact Check News: पुन्हा एकदा कोरोनानं (Coronavirus) संपूर्ण जगाची धाकधूक वाढवली आहे. चीनमध्ये (China) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या धास्तीखाली आहे. अनेक देशांनी खबरदारी म्हणून कोरोनासंदर्भातील (Covid-19) नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही देशवासीयांना केलं आहे. अशा परिस्थितीत भारतातही कोरोनाबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर कोरोनाच्या सब-व्हेरियंट्सबाबतही अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. असंच एक व्हायरल वृत्त (Viral News) खोटं असल्याचं पीआयबीच्या फॅक्ट चेक (Fact Check) युनिटनं सांगितलं आहे. 


दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बातमीमध्ये असं बोललं जात आहे की, कोरोनाचे ओमायक्रॉन व्हेरियंटचे BA.5 हे सब-व्हेरियंट मेंदूसाठी घातक ठरू शकतं. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर हे वृत्त व्हायरल होत आहे. याच वृत्ताचा आढावा पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटनं घेतला आहे. 


ट्विटरवर यावर प्रतिक्रिया देताना पीआयबीच्या (PIB) फॅक्ट चेक युनिटनं सांगितलं आहे की, ही बातमी दिशाभूल करणारी आहे आणि असं काहीही घडत नाही. संशोधनात अशी कोणतीही गोष्ट सिद्ध झालेली नाही. 






अहवालात काय म्हटलंय?


एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, संशोधकांचा असा विश्वास आहे की, चीनमध्ये वाढणारा कोरोना व्हायरसचा सब-व्हेरियंट BA.5 मेंदूवर हल्ला करण्यासाठी विकसित झाला असावा. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनं अहवाल दिला आहे की, संशोधनात पूर्वीच्या गृहीतकांना आव्हान दिलं आहे की, व्हायरस सामान्यत: कमी धोकादायक बनतात. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन सब-व्हेरियंट BA.5 वरील नव्या संशोधनात असं नमूद करण्यात आलं आहे की, हा सब-व्हेरियंट मेंदूवर हल्ला करतो.


या अहवालात असंही म्हटलं आहे की, अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, BA.5 हे इतर ओमायक्रॉन सब-व्हेरियंट्सपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे आणि कोविड लसीकरणानंतरही या व्हेरियंटची लागण होणं शक्य आहे. हा प्रकार 100 हून अधिक देशांमध्ये आढळून आला आहे. या सब-व्हेरियंटचा उद्रेक चीन, जपान तसेच अमेरिका आणि युनायटेड किंगडम सारख्या देशांमध्ये दिसून येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Superbug : चिंता वाढली! कोरोनानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका बनणार 'सुपरबग', एक कोटी मृत्यू होण्याची शक्यता