Today In History:  आजच्या दिवशी (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 3 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 


भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्याशिवाय, भारतीय अंतराळ संशोधनातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ सतीश धवन यांचा स्मृती दिन आहे. 



1831: सावित्रीबाई फुले यांची जयंती


भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षण आणि सामाजिक चळवळीत सावित्रीबाई फुले यांनी मोठी साथ दिली. त्याशिवाय, सावित्रीबाई फुले या कवयित्रीदेखील होत्या. शिक्षण क्षेत्रामध्येच नव्हे तर समाजातील अनिष्ट रूढी- परंपरांना देखील छेद देत त्यांनी मोकळा श्वास घेण्यास मोलाची कामगिरी बजावली. 


महाराष्ट्र सरकारने तीन वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांची जयंती ही ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. महिला आणि बालविकास खात्याच्यावतीने हा दिवस साजरा करण्यात येतो. 


1925: बेनिटो मुसोलिनी इटलीच्या सत्तेवर 


दुसऱ्या महायुद्धात जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरला साथ देणारा इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी हा इटलीच्या सत्तेवर आला. फॅसिझमच्या विचारांचा मुसोलिनी प्रमुख पाठिराखा समजला जातो. इटलीत फॅसिस्ट विचारांची पायाभरणी करणाऱ्यांमध्ये त्याचे नाव अग्रस्थानी आहे.   


1921: चित्रपट निर्माते-दिग्दर्शक चेतन आनंद यांची जयंती


हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक, निर्माते चेतन आनंद यांची आज जयंती. चेतन आनंद हे अभिनेते देव आनंद यांचे ज्येष्ठ बंधू होते. लाहोरमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1930 च्या दशकात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी डून स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे लेखन-दिग्दर्शन केले आहे.  


1931: विचारवंत, इतिहास संशोधक य. दि. फडके यांची जयंती


महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण य दि म्हणून ओळखले जाणाऱ्या यशवंत दिनकर फडके यांचा 1931 मध्ये सोलापूर जिल्ह्यात जन्म झाला. य.दि. फडके यांनी  राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी. ए. (१९५१) व एम. ए. (१९५३) ही पदवी त्यांनी मिळवली. १९७३ साली ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि काँग्रेस पक्ष’ या प्रबंधासाठी मुंबई विद्यापाठाने त्यांना पीएच. डी. पदवी दिली. य. दि. फडके यांची स्वतंत्र व संपादित अशी एकूण 62 पुस्तके इंग्रजीत आहेत. त्यांचे ह बव्हंश लेखन विचावंतांच्या चरित्रांचा व कार्याचा तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचा वेध घेणारे आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्र (1901 ते 1947) हा त्यांनी लिहिलेला महाराष्ट्राच राजकीय इतिहास पाच खंडातून प्रसिद्ध झालेला आहे.


1938: अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी पोलिओ रोगावर उपचार शोधण्यासाठी एक फाउंडेशन स्थापन केले. रूझवेल्ट 1921 मध्ये या आजाराच्या विळख्यात होते.


1950:  पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन


राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची पुणे शहरात सुरूवात झाली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जे. डब्ल्यू. मॅकबेन हे कॅनॅडियन शास्त्रज्ञ या संस्थेचे पहिले संचालक होते. दोन वर्षांनी ते निवृत्त झाल्यावर जी. आय. फिंच हे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ या संस्थेचे पाच वर्ष संचालक होते. नंतर मात्र एनसीएलचे पहिले भारतीय संचालक कृष्णासामी वेंकटरामन ह्यांनी सूत्रे हाती घेतली. नोबेल पुरस्कार विजेते रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इंग्लंड मधून पीएच्. डी. पदवी मिळवली होती. आपल्या नऊ वर्षांच्या कालावधीत त्यांनी संस्थेला चांगली दिशा दिली. एनसीएलच्या जडणघडणीत त्यांच्याबरोबरच त्यांच्यानंतर आलेल्या संचालकांनी मोलाचे योगदान दिले. 


एनसीएल या संस्थेच्या कामाचे अनेक पैलू आहेत. रसायने बनविणार्‍या कारखान्यांना मदत करणे, उपयुक्त रसायनांची निर्मिती करणे आणि सामाजिक समस्या सोडविण्यासाठी काम करणे अशा अनेक स्तरांवर ही प्रयोगशाळा कार्य करीत असते. या तीनही क्षेत्रात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने बहुमोल अशी कामगिरी केली आहे. 



2000:  डॉ. सुशिला नायर यांचे निधन 


स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या डॉ. सुशिला नायर यांचे निधन झाले. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. 


2002: सतीश धवन यांचे निधन 


भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ सतीन धवन यांचे 3 जानेवारी 2000 रोजी निधन झाले.  त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर इस्रोची धुरा त्यांच्या हाती आली. सतीश धवन हे 1972 मध्ये अध्यक्ष झाले.