Kishore Account Suspended : ट्विटरने लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेते किशोर (south indian Kishore) याचे अकाउंट सस्पेंड केले आहे. सामाजिक आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर किशोर हे कोणतीही भीती न बाळगता आपले विचार मांडण्यासाठी ओळखले जातात. असं असलं तरी किशोरने अद्याप त्याचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. किशोरने यापूर्वीही साई पल्लवीच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले होते. ज्यामध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येची तुलना मुस्लिमांच्या हत्यांशी करण्यात आली होती. 


Kishore Account Suspended : 'कंतारा' मनोरंजनातून जनजागृती 


सुपरहिट चित्रपट 'कंतारा'मध्ये (Kantara Movie) ऋषभ शेट्टी विरुद्ध मुख्य विरोधीची (पोलीस अधिकारी) भूमिका करणारा अभिनेता किशोर हा अंधश्रद्धेच्या विरोधात बोलला आहे. 'कंतारा'वर तो म्हणाला होता की, सर्व चांगल्या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटानेही जात, धर्म आणि भाषेच्या सीमा ओलांडून लोकांना जोडले आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती होत आहे. अंधश्रद्धेला चालना देण्यासाठी आणि जातीय भावना भडकावून लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी सिनेमाचा वापर होत असेल, तर एखादा मोठा चित्रपटही मानवतेचा सर्वात मोठा पराभव ठरेल, असे तो म्हणाला आहे.


Kishore Account Suspended : किशोरने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये केलं आहे काम 


किशोर कुमार हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे, ज्याचा जन्म कर्नाटकात झाला. त्याने अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. किशोरने कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये स्वतःच एक स्थान निर्माण केलं आहे.


Kantara Movie part 2 : कंताराचा येणार सिक्वेल? 


'हॉम्बल फिल्म्स प्रॉडक्शन' या बॅनरखाली 2022 या वर्षातील दोन सर्वात यशस्वी चित्रपटांची निर्मिती झाली आहे. हे दोन चित्रपट म्हणजे सुपरस्टार यश स्टारर 'KGF 2' आणि ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' (Kantara Movie). ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा' या चित्रपटाने वर्षाच्या अखेरीस चित्रपटगृहांमध्ये एवढी धमाल केली आहे की, ते विसरणे फार कठीण आहे. हॉम्बल प्रॉडक्शनचे संस्थापक विजय किरगंडूर आणि चालुवे गौडा यांनीही ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट ऑस्कर नामांकनासाठी पाठवला आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी 'कंतारा 2' (Kantara Movie Part 2) बाबत खुलासा केला आहे. सिक्वेलबद्दल बोलताना निर्मात्यांनी खुलासा केला की, 'आमच्याकडे एक योजना आहे. आम्ही इतर गोष्टींमध्ये व्यस्त होतो आणि ऋषभनेही महिनाभर ब्रेक घेतला. तो परत येताच आम्ही फ्रँचायझीसाठी आमची योजना ठरवू.''