एक्स्प्लोर

सर्जिकल स्ट्राईक : ट्रकमधून अतिरेक्यांचे मृतदेह नेले, प्रत्यक्षदर्शींचा दावा

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्यक्षदर्शींनी तोंडघशी पाडलं आहे. 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात खात्मा केलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमधून अज्ञातस्थळी नेऊन दफन केले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केल आहे. भारतालगतच्या एलओसीजवळ राहणाऱ्या 5 प्रत्यक्षदर्शींशी संपर्क साधून ही माहिती समोर आणल्याचा दावा इंडियन एक्स्प्रेसने केला आहे.

सर्जिकल स्ट्राईक निव्वळ बनाव, संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप

स्थानिकांच्या माहितीवर प्रत्यक्षदर्शींचा दावा प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, "29 सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्य आणि अतिरेक्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री झाली होती. इतकंच नाही तर पहाटेच्या सुमारास सर्जिकल स्ट्राईक संपल्यानंतर, दहशतवाद्यांचे मृतदेह काही ट्रकमध्ये भरुन अज्ञातस्थळी दफन करण्यासाठी नेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली." सर्जिकल स्ट्राईक अगदी जवळून अनुभवल्याचं प्रत्यक्षदर्शींपैकी दोघांनी सांगितलं. ते दोघे दुदनैलमध्ये होते. ही जागा एलओसीपासून 4 किमी  आत (पाकव्याप्त काश्मीरच्या बाजूने) आहे. तिथे अल-हवाई नावाचा एक पूल आहे. त्याच्याजवळ अलेली इमारत उद्ध्वस्त केली. याच ठिकाणाहून दहशतवादी सामान घेऊन भारतात दाखल होण्यासाठी येतात. सकाळी काही मृतदेह ट्रकमधून भरुन नेले.

सैन्याचा अपमान करु नका, भाजपचा केजरीवालांवर हल्लाबोल

उरीचा बदला, भारताचं सर्जिकल स्ट्राईक उरीमध्ये भारतीय जवानांच्या कॅम्पवरील हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. एलओसी पार करुन भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांना खात्मा झाला. पाकिस्तानसह संशयी नेत्यांचे दात घशात प्रत्यक्षदर्शींच्या या दाव्यामुळे सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेणाऱ्या पाकिस्तानसह भारतातील काही नेत्यांचे दात घशात गेले आहेत. भारताने सर्जिकल स्ट्राईक केलाच नाही, असा दावा पाकिस्तान करत आहे.

...म्हणून अमावस्येच्या आदल्या रात्री 'सर्जिकल स्ट्राईक'!

शिवाय काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकवरच प्रश्न उपस्थित केले होते. सर्जिकल स्ट्राईकबद्दल जोपर्यंत पुरावे मिळत नाही, तोवर संशय कायम राहील. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पुरावे द्यावेत, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. इतकंच नाही तर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, मात्र तो खोटा आणि राजकीय फायद्यासाठी नको, असं ट्वीटही निरुपम यांनी केलं होतं.

सर्जिकल स्ट्राईक: डोग्रा आणि बिहार रेजिमेंटने बदला घेतला

सर्जिकल स्ट्राईकबाबत पाकिस्तान खोटा दावा करत असून गैरसमज पसरवत आहे. पाकिस्तानच्या या खोट्या प्रचाराचा सरकारने पर्दाफाश करावा, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

CJI Suryakant on Delhi Police Lathicharge: आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश
आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश
PM Modi Video Ban Facebook: फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा तो व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, नेमकं काय घडलं?
फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा तो व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, नेमकं काय घडलं?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Shetkari Karjmafi: कर्जमाफीची यादीमध्ये गोंधळ; कर्ज माफीच्या यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेमध्ये तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
कर्जमाफीची यादीमध्ये गोंधळ; कर्ज माफीच्या यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेमध्ये तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Embed widget