आयएलएफएसकडून सहा हजार कोटींचा गंडा,19 बँकांची फसवणूक
पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक आणि अन्य बँकांना या घोटाळ्यााच फटका बसला आहे.
नवी दिल्ली : आयएल अँड एफएस ( IL&FS) कंपनीने देशातील प्रमुख 19 बँकांची तब्बल 6,524 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक आणि अन्य बँकांना या घोटाळ्यााच फटका बसला आहे.
देशातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीत कार्यरत असलेल्या या कंपनीने 19 बँकांकडून हे कर्ज घेतले होते. मात्र, कंपनीमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 2018 मध्ये एनसीएलटी कंपनीमध्ये नवे संचालक मंडळ स्थापन केले. त्यानंतर कंपनीच्या पूर्व संचालकांनी केलेला आर्थिक घोटाळा समोर आला. याप्रकरणी आता पुढील तपास सध्या सुरु आहे.
आरोपी हे व्हाईट कॉलर गुन्हेगार
कॅनरा बँकेने सीबीआयला केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ITL द्वारे 6,524 कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा घोटाळ केला आहे. आरोपी हे व्हाईट कॉलर गुन्हेगार असून त्यांना कायद्याची चांगली माहिती आहे. कायद्याच्या कचाट्यातूव स्वतःला कसे वाचवायचे हे देखील माहित आहे.
2018 साली कंपनीच्या पूर्व संचालकांनी केलेला आर्थिक घोटाळा उजेडात
आयएल अँड एफएस कंपनीने घेतलेल्या कर्जाचा दुरुपयोग केला. तसेच देशातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीत कार्यरत असलेल्या कंपनीने 19 बँकांकडून हे कर्ज घेतले होते. मात्र, कंपनीमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 2018 साली राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने (एनसीएलटी) कंपनीमध्ये नवे संचालक मंडळ स्थापन केले. त्यानंतर कंपनीच्या पूर्व संचालकांनी केलेला आर्थिक घोटाळा उजेडात आला आहे.