एक्स्प्लोर

ED News : बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरण; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याची ईडीकडून चौकशी

विविध प्रकरणावरुन ईडीकडून अनेक राजकीय नेत्यांची चौकशी केली जात आहे. काही नेत्यांवर कारवाई देखील झाली आहे. दरम्यान, आणखी एका माजी मुख्यमंत्र्याची ईडीने चौकशी केली आहे.

ED News : काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर पंजाबमध्ये महिन्यभरातच काँग्रसचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यामागे ईडीची (ED) चौकशी लागली आहे. ईडीकडून चरणजीत सिंह चन्नी यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे चन्नी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीने चरणजित सिंग चन्नी यांना वाळू उत्खनन प्रकरणात चौकशी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणी ही चौकशी केली आहे. चरणजीत सिंह चन्नी यांची जालंधर येथील ईडीच्या झोन कार्यालयात चौकशी करण्यात आली. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चन्नी यांच्या भाच्यावर देखील कारवाई करण्यात आली होती. ईडीने कर चुकवेगिरी प्रकरणात त्यांचे भाचे भूपिंदरसिंग हनी यांना अटक केली होती. या प्रकरणामुळं पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ही कारवाई राजकीय असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. अवैध वाळू उपसा प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने चरणजीत सिंह चन्नी यांना यापूर्वी अनेकदा समन्स पाठवले होते. ईडीच्या अधिकार्‍यांनी चन्नी यांचे हनी आणि इतरांशी असलेले संबंध आणि त्यांच्या भाच्याने मुख्यमंत्री कार्यालयात केलेल्या काही भेटींबद्दल चौकशी केली. राज्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननाचा एक भाग म्हणून काही अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्ती केल्याच्या आरोपांबाबत चरणजित सिंग चन्नी यांची चौकशी करण्यात आली.
 
पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राज्यातील काँग्रेसमधील धुसफूस वाढली आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर अनेक काँग्रेस नेते नाराज आहेत. चन्नी यांच्या चेहऱ्यामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. चन्नी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही पक्षाने निवडणुकीत चेहरा बदलला नाही, असे पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस देखील असल्याचे पाहायला मिळत आहे.

कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर आमदार चरणजीतसिंग चन्नी यांची वर्णी लागली होती. कॅबिनेट मंत्री आणि तीन वेळा आमदार असलेले चन्नी हे पंजाबमध्ये पहिले मागासवर्गीय मंत्री होते. मात्र, त्यांना चमकौर साहिब व भदौड या दोन्ही जागांवर पराभव स्वीकारावा लागला. ज्या पाच राज्यांमध्ये विधानसेच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी पंजाब हे एकमेव राज्य काँग्रसच्या ताब्यात होते. मात्र, तिथेही कँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे काँग्रेसची पंजाबमध्ये ताकद कमी झाली आहे. पाचपैकी चार राज्यात भाजपने वर्चस्व राखले आहे, तर पंजाबमध्य आम आदमी पार्टीने करिष्मा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Kerala Elephant Calf Maya: केरळची 'माया' वनतारामध्ये दाखल; जामनगरच्या प्रवासासाठी खास विमानाची सोय, 18 महिन्यांच्या हत्तीच्या पिल्लावर होणार विशेष उपचार
केरळची 'माया' वनतारामध्ये दाखल; जामनगरच्या प्रवासासाठी खास विमानाची सोय, 18 महिन्यांच्या हत्तीच्या पिल्लावर होणार विशेष उपचार
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
NCMC Card ST Bus : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Hasan Mushrif On Satej Patil Gokul President 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
Embed widget