एक्स्प्लोर
गोव्यात आता प्रदूषण विरहित इलेक्ट्रिक बस धावणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते कदंबच्या पणजी बस स्थानकावर या बसचं लोकार्पण करण्यात आलं.

पणजी : पर्यटकांचं नंदनवन असलेल्या गोव्याचं पर्यावरण राखण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी प्रदूषण विरहीत इलेक्ट्रिक बस आजपासून रस्त्यांवर धावणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते कदंबच्या पणजी बस स्थानकावर या बसचं लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी बसमधून फेरफटका मारल्यानंतर प्रयोग यशस्वी ठरला तर अशा बसेस कदंबच्या ताफ्यात दाखल करून घेतल्या जातील, असं सांगितलं.
प्रायोगिक तत्वावर ही बस दररोज 200 किमी गोव्यातील रस्त्यांवर धावणार आहे. या बसमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण देखील होत नाही. पर्वरी येथे ही बस चार्ज करण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे. ही बस दिव्यांग फ्रेंडली आहे. 37 आसनी बस 50 आसनी करण्याचा कदंबचा विचार आहे. यावेळी वाहतूक मंत्री सुदीन ढवळीकर, कदंबचे अध्यक्ष कार्लुस आलमेदा उपस्थित होते.
प्रायोगिक तत्वावर ही बस दररोज 200 किमी गोव्यातील रस्त्यांवर धावणार आहे. या बसमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण देखील होत नाही. पर्वरी येथे ही बस चार्ज करण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे. ही बस दिव्यांग फ्रेंडली आहे. 37 आसनी बस 50 आसनी करण्याचा कदंबचा विचार आहे. यावेळी वाहतूक मंत्री सुदीन ढवळीकर, कदंबचे अध्यक्ष कार्लुस आलमेदा उपस्थित होते. आणखी वाचा























