एक्स्प्लोर
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता
निवडणूक आयोगाने दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद बोलावली होती. पण नंतर दुपारी तीनची वेळ देण्यात आली. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारीख आज जाहीर होऊ शकते.
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे, ज्यात ही घोषणा केली जाऊ शकते.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजपचा थेट सामना काँग्रेससोबत होणार आहे. त्यामुळे भाजपपुढे या तीन मोठ्या राज्यांमधील सत्ता वाचवण्याचं आव्हान असेल. सर्वच पक्षांकडून प्रचाराची जोरदार सुरुवात करण्यात आली आहे.
तेलंगणा विधानसभा काही दिवसांपूर्वीच भंग करण्यात आली आहे. टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. तर दुसरीकडे मिझोराम या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
मध्य प्रदेश
2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 165 जागांसह बहुमत मिळवलं होतं. 231 सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 57, तर बसपाचे चार आमदार आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे.
राजस्थान
राजस्थान विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 200 आहे. 2013 सालच्या निवडणुकीत भाजपने 160 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. तर काँग्रेसला केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी काँग्रेस आणि भाजपची थेट टक्कर असेल.
छत्तीसगड
91 सदस्यसंख्या असलेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने 2013 साली 49 जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत. त्यामुळे आता छत्तीसगडमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement