Election Commission :  देशातील कोरोना रुग्णांची  संख्या लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका होणार असलेल्या पाच राज्यांमध्ये रॅली आणि रोड शोवर असलेली बंदी 11  फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवली आहे.  पाच राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुक आयोगाने प्रथम  15 जानेवारी ,  22 जानेवारी, नंतर 31 जानेवारीपर्यंत रॅली, रोड शोवर बंदी घातली होती.  तसेच घरोघरी प्रचारासाठी फक्त पाच जणांनाच परवानगी दिली होती. मात्र आता घरोघरी प्रचारासाठी  20  जणांना निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.  11 फेब्रुवारीला पुन्हा एकदा कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निवडणुक आयोग रॅली आणि रोड शोबाबत निर्णय घेणार आहे.


देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आयोगाने निवडणूक आयोगान उमेदवारांना थोडा दिलासा दिला आहे.  एक हजार लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. तर खुल्या मैदानात 50 टक्के क्षमतेसह उपस्थितीला परवानगी दिली आहे. तसेच इनडोअरसाठी  500 जणांसह मीटिंगला परवानगी दिली आहे. जी संख्या पूर्वी 300 होती. तर  घरोघरी प्रचारासाठी  20 जणांना परवानगी दिली होती. जी अगोदर 10 जणांना परवानगी होती. निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि  उमेदवारांना  डोअर टू डोअर प्रचारासाठी  परवानगी दिली आहे. तसेच व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. काही पक्षांनी तर याची सुरुवात देखील केली आहे. परंतु उत्तरप्रदेशसारख्या राज्यात विना रॅली निवडणुकांचा प्रचार कसा होणार यासाठी काही पक्ष चिंतेत आहे.


 






कोणत्या राज्यात कधी मतदान?


उत्तर प्रदेश



  •  पहिला टप्पा - 10 फेब्रुवारी रोजी मतदान

  • दुसरा टप्पा - 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान

  • तिसरा टप्पा  - 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान

  • चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान

  • पाचवा टप्पा - 27फेब्रुवारी 2022

  • सहावा टप्पा - 3 मार्च 2022 रोजी मतदान

  • सातवा टप्पा - सात मार्च 2022 रोजी मतदान



पंजाब - 14 फेब्रुवारी  2022


उत्तराखंड - 14 फेब्रुवारी  2022 




गोवा - 14 फेब्रुवारी  2022 


मणिपूर -



  • पहिला टप्पा - 27 फेब्रुवारी 2022

  • दुसरा टप्पा - तीन मार्च 2022


संबधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha