Exports and Imports : 2021-22 मध्ये आतापर्यंत भारतातील वस्तू आणि सेवा या दोन्हींची निर्यात मजबूत राहिली आहे. 2021-22 मध्ये सलग आठ महिने व्यापारी मालाची निर्यात US$ 30 बिलियनच्या वर गेली आहे. कमी कार्यरत असणारी शिपिंग जहाजे, सुएझ कालव्यामध्ये वाहतुकीस येणारा अडथळा आणि चीनच्या बंदर शहरात झालेला कोरोनाचा उद्रेक या संकटांचा सामना करत निर्यातीत वाढ झाली आहे. या जागतिक पुरवठ्यातील अडचणींमुळे व्यापार खर्चात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, 2021-22 मध्ये भारताची एकूण निर्यात 16.5 टक्‍क्‍यांनी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


व्यावसायिक आणि व्यवस्थापन सल्ला सेवा, दृकश्राव्य आणि संबंधित सेवा, मालवाहतूक वाहतूक सेवा, दूरसंचार, संगणक आणि माहिती सेवा  यांच्यामुळे निव्वळ सेवा निर्यातही एकाच वेळी झपाट्याने वाढली आहे. मागणीच्या दृष्टीकोनातून, 2021-22 मध्ये भारताची एकूण निर्यात 16.5 टक्‍क्‍यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. व्यावसायिक आणि व्यवस्थापन सल्लागार सेवा, दृकश्राव्य आणि संबंधित सेवा, मालवाहतूक सेवा, दूरसंचार, संगणक आणि माहिती सेवा यामुळे निव्वळ सेवा निर्यातीत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटाचा जरी सर्वच क्षेत्राला फटका बसला असला तरी सध्या मागणीच्या दृष्टीकोनातून, भारताची एकूण निर्यातीत 2021-22 मध्ये 16.5 टक्‍क्‍यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, देशांतर्गत मागणीचे पुनरुज्जीवन आणि आयातीत क्रूड आणि धातूंच्या किंमतीत सतत वाढ झाल्याने आयाततही वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये आयातीत 29.4 टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.


भारताची निव्वळ निर्यात 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत नकारात्मक झाली आहे. 2020-21 च्या संबंधित कालावधीतील वाढीच्या तुलनेत चालू खात्यात पहिल्या सहामाहीत GDP च्या 0.2 टक्के इतकी माफक तूट नोंदवली गेली आहे. दरम्यान, परकीय गुंतवणुकीच्या निरंतर प्रवाहाच्या रूपात मजबूत भांडवलाचा प्रवाह माफक चालू खात्यातील तूट भरण्यासाठी पुरेसा होता. परकीय गुंतवणुकीच्या निरंतर प्रवाहाच्या रूपात मजबूत भांडवलाचा प्रवाह माफक चालू खात्यातील तूट भरण्यासाठी पुरेसा होता. वाढलेल्या जागतिक वस्तूंच्या किंमती, आर्थिक व्यहरांचे पुनरुज्जीवन, उच्च देशांतर्गत मागणी आणि भांडवली प्रवाहाभोवती वाढणारी अनिश्चितता यामुळे वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत चालू खात्यातील तूट आणखी वाढू शकते असे सांगण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: