Eid-Ul-Fitr 2023 : देशासह जगभरात आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' साजरी केली जात आहे. मुस्लीम बांधवांचा ईद हा अत्यंत पवित्र सण आहे. या दिवसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो. याच पार्श्वभूमीवर आज पहाटेपासूनच ईदच्या नमाजासाठी मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांची गर्दी होऊ लागली आहे. लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. काल म्हणजेच (21 एप्रिल) रोजी भारतात संध्याकाळी ईदचा चंद्र दिसल्यानंतर आज सगळीकडे ईदचा उत्साह पाहायला मिळतोय.  


असे मानले जाते की, पवित्र कुराण पहिल्यांदा रमजान महिन्यातच आले होते. प्रेषित मोहम्मद मक्का सोडल्यानंतर मदिना येथे ईद साजरी सुरू झाली. असे म्हणतात की, बद्रच्या लढाईतील विजयाच्या आनंदात पैगंबरांनी सर्वांचं तोंड गोड केलं. या दिवसाला बोलीभाषेत 'मीठी ईद' असेही म्हणतात. ईदचा चंद्र दिसताच बाजारपेठांमध्ये रंगत आणखी वाढत चालली आहे. तसेच, घराघरातही अगदी जोरदार तयारी सुरु आहे. 


ईदच्या दिवशी लोक नवीन कपडे घालून मशिदीत जातात, नमाज अदा करतात आणि अल्लाहकडे शांतीसाठी प्रार्थना करतात. देशाच्या विविध भागात असलेल्या मशिदींमध्ये ईदची नमाज अदा केली जाते. 


चंद्रदर्शनाला अलविदा म्हणत ईदचं स्वागत 


याआधी शुक्रवारी शेवटच्या दिवशी चंद्राचं दर्शन झालं. यावेळी शुक्रवार सायंकाळ होताच चंद्र पाहण्यासाठी लोक छतावर गेले. चंद्रदर्शनानंतर शनिवारी ईद साजरी करण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून बाजारातील रंगत वाढली आहे. रात्रभर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता मात्र, आज सगळे बांधव अगदी आनंदाने एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले.


उत्तर प्रदेशात हाय अलर्ट


यूपीमध्ये ईद संदर्भात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ईदनिमित्त राज्यात कडक सुरक्षेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रयागराज, लखनौ, कानपूर, अलीगढ, बरेली, वाराणसी, अयोध्या आणि मथुरा यांसह सर्व संवेदनशील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये शुक्रवारी सकाळपासून पोलिस दलाने फ्लॅग मार्च काढला. तसेच, आरएएफ, पीएसी आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यूपीचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, अलविदा प्रार्थना शुक्रवारी चांगली पूर्ण झाली. या कालावधीत कोणतीही अनुचित माहिती प्राप्त झाली नाही.


कडेकोट बंदोबस्तात अलविदा प्रार्थना वाचली


याआधी दिल्लीच्या जामा मशिदीत कडक सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या संख्येने अलविदा नमाज अदा करण्यात आली. अलविदा जुम्मेच्या प्रार्थनेत शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी अलविदाच्या नमाजानंतर लखनौच्या आसिफी मशिदीत इस्रायल आणि अमेरिकेविरोधात निदर्शने करण्यात आली. अमेरिका-इस्रायलमधील शिया समुदायावर झालेल्या हल्ल्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला.


Eid Mubarak 2023 : ईद मुबारक! देशभरात देशात आज साजरी होतेय ईद-उल-फित्र, महिनाभर रोजा ठेवल्यावर आज सेलिब्रेशनचा मूड