Mango Farming : सध्या देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका आहे तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच देशातील काही भागात अवकाळी पावासानंही (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं आंबा पिकाला (Mango Crop)  मोठा फटका बसला आहे. देशातील ओडिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आंबा पिकांची नासाडी झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 
 
अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी अस्वस्थ आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळं फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच भाजीपाला पिकालाही फटका बसला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याची मोठी नासाडी झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी सरकारकडं नुकसान भरपाईची मागणी केली आहे.


उत्तर प्रदेशातील आंबा बागांना मोठा फटका


उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील आंबा बागांवर पाऊस आणि गारपिटीचा मोठा परिणाम झाला आहे. या हंगामात चित्रकूटमधील आंब्याच्या झाडांना मोहोर येत असल्याचं कृषी तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, बदलत्या आणि खराब हवामानामुळं आंब्याच्या झाडांचा मोहोर गळून पडला आहे. अवकाळी पावसामुळं निर्माण झालेला ओलावा, त्यामुळं आंबा पिकावर रोगराई निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळं चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं.


ओडिशातही आंब्याची नासाडी 


ओडिशातही अवकाळी पावसाचा परिणाम आंब्याच्या बागांवर होताना दिसत आहे. ओडिशामध्ये अवकाळी पाऊस आणि आता तापमानात अचानक वाढ झाल्यामुळं आंब्याच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. राज्यातील कोरापूट जिल्ह्यात 70 टक्के आंबा वाया गेला आहे. त्यामुळं राज्यात व्यापारी परराज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आयात करत आहेत. कुंद्रा, दशमंतपूर, जेपोर, बोरीगाम्मा, सेमिलीगुडा आणि लक्ष्मीपूर भागातही आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. यंदा राज्यात कमी खप अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळं पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेशातील व्यापारीही आंबा खरेदी करत आहेत.


शेतकऱ्यांना मोठा आर्थिक पटका


गेल्या अनेक वर्षांपासून या बदलत्या बावावरणाचा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पिकांचं नुकसान झाल्यानं मोठा तोटा सहन करावा लागत आहे. यावेळी चांगले पीक येण्याची शक्यता होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं आमचं मोठं नुकसान केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : बदलत्या वातावरणाचा आंबा पिकावर परिणाम, तुडतुडा रोगासह मोठ्या प्रमाणात फळगळ