मुंबई : ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून आयसीआयसीआय बँकेचे माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. आयसीआसीआय बँक व्हिडीओकॉन केस प्रकरणात ही कारवाई ईडीने केली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.


गैरव्यवहार करून कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवासस्थानांवर अंमलबाजवणी संचालनालय (ईडी) गेल्या काही महिन्यांपासून तपास करत आहे. मागील महिन्यात यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते.


SSR Case | सुशांतची बहिण मीतू सिंहची आज CBI चौकशी, तर ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी ED समोर हजर होणार गौरव आर्या




सुशांतकडून 10 कोटी रुपये कसे मिळाले? ईडीने जया साहाला विचारले प्रश्न

काय आहे प्रकरण?
चंदा कोचर यांच्यावर त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर केलाया आरोप आहे. आयसीआयसीआयने व्हिडीओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. व्हिडीओकॉन ग्रुपने कर्जाच्या 86 टक्के रक्कम चुकवली नव्हती. 2017 मध्ये हे कर्ज NPA मध्ये टाकण्यात आलं. व्हिडीओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांनी 2010 मध्ये न्यू पॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेडला 64 कोटी रुपये दिले होते. चंदा कोचर यांचे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागच्याच महिन्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता.


चंदा कोचर यांच्यावरील आरोप
धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावानं कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती. हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.


SSR Suicide Case | रिया चक्रवर्ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल