मुंबई : सीबीआयने आज सकाळी 11 वाजता सुशांतची बहिण मीतू सिंहला चौकशीसाठी बोलावलं आहे. मीतू सिंहची डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये चौकशी करण्यात येणार आहे. मीतू सिंहकडून सीबीआय पथक 8 जूनपासून ते 12 जूनपर्यंतच्या घटनांबाबत जाणून घेणार आहे. मीतू सिंहला रियाने केलेल्या दाव्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलं आहे. सीबीआय सुशांतच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी करणार आहे.


मीतू सिंह व्यतिरिक्त सीबीआय फरीदाबादमध्ये राहणारी सुशांतची बहिण प्रियांका आणि तिच्या पतीचीही चौकशी करणार आहे. यांची चौकशी सीबीआयचं दिल्लीतील पथक करणार आहे. गरज पडल्यास सुशांतच्या दोन्ही बहिणी, रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठानी, नीरज, दीपेश यासर्वांना समोरासमोर बसवून सीबीआयचं पथक प्रश्न विचरू शकतं. सुशांतची बहिण मीतू 8 जून ते 12 जूनपर्यंत आपल्या भावासोबत होती. त्यामुळे तिला या पाच दिवसांचा घटनाक्रम विचारण्यात येणार आहे.


गौरव आर्यचीही चौकशी


सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी गौरव आर्यची आज ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. गौरव आर्यला आज सकाळी 11 वाजता ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. गौरव आर्यने रविवारी गोव्याहून मुंबईसाठी निघताना सांगितले होते की, तो 2017मध्ये रिया चक्रवर्तीला भेटला होता. त्यानंतर तो रियाला भेटला नाही. तसेच सुशांत सिंह राजपूतला तो केव्हाच भेटला नसल्याचंही त्याने सांगितलं आहे. दरम्यान, गौरव आर्य एअरपोर्टवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना टाळताना दिसून आला.


पाहा व्हिडीओ : मी सुशांतला कधीच भेटलो नाही, रियाला 2017 मध्ये शेवटचं भेटलो - गौरव आर्या



रियासोबत ड्रग्जबाबत चॅट केलं होतं


गौरव आर्य म्हणजे, ज्याने रिया चक्रवर्तीसोबत ड्रग्जसंदर्भात चॅट केलं होतं. काही दिवसांपूर्वी रियाच्या जुन्या व्हॉट्स अॅप चॅटमधून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. यासंदर्भात ईडीकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.


समोर आलेल्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये रिया चक्रवर्ती गौरवला म्हणाली होती की, तिने एकदा MDMA ट्राय केलं आहे. हे चॅट समोर आल्यानंतर या प्रकरणात आता NCB (नार्कोटिक्स विभाग) सहभागी करण्यात आलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आता ड्रग्ज अँगलही तपासण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :