DGCI on Sputnik V Testing :  अॅस्ट्राजेनिकासोबत मिळून देशात कोविशील्ड लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील  सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII)ला रशियाची स्पुटविक-V लस बनवण्याची परवानगी मिळाली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या माहितीच्या आधारे सांगितलं आहे की, लस परीक्षण आणि विश्लेषणासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून काही अटीशर्तींसह शुक्रवारी सीरमला परवानगी मिळाली आहे.  


याआधी सीरम इंस्टिट्यूटने पुण्यात असलेल्या हडपसर केंद्रामध्ये लसीचं परीक्षण, पाहणी आणि विश्लेषणासाठ स्पुटनिक-V निर्मितीसाठी परवानगी मागितली होती. तसा अर्ज सीरमकडून डीजीसीआयला करण्यात आला होता. पुण्यात असलेल्या हडपसर केंद्रात स्पुटनिक-V निर्मितीसाठी सीरमनं मॉस्कोच्या गमलेया रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी सोबत करार केला आहे. 


Apollo Hospital Sputnik V: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्पुटनिक व्ही लस नागरिकांना दिली जाणार


सूत्रांनी सांगितलं की, सीरम इंस्टिट्यूटनं 18 मे रोजी जैव प्रौद्योगिकी विभागाच्या ‘जेनेटिक मॅनिप्युलेशन रिव्ह्यू कमिटी (आरसीजीएम)’लो देखील अर्ज करुन संशोधन आणि विकास कामासासाठी स्ट्रेन किंवा कोशिका बॅंकेची आयात करण्यासाठी परवानगी मागितली होती. आरसीजीएमनं सीरमला या अर्जानंतर काही सवाल केले होते. तसेच पुण्यात असलेली कंपनी आणि गमलेया रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीसोबत झालेल्या करारासंबंधीच्या प्रतिंची मागणी केली होती.  


Sputnik V in India: भारतात स्पुटनिक V लसींचं उत्पादन करणार 'ही' कंपनी, वर्षाला 10 कोटी डोस निर्मितीचं टार्गेट


भारतात रशियाची लस स्पुटनिक-व्हीची किंमत निश्चित केली गेली आहे. याची किंमत 948 रुपये असेल यावर पाच टक्के जीएसटी लागल्यानंतर त्याच्या एका डोसची किंमत 995 रुपये असेल. रशियन लस स्पुटनिक-व्हीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली. कोरोनाव्हायरसच्या संसर्गाविरूद्ध रशियन  Sputnik V लस वापरण्यास अधिकृत  मान्यता देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या, काही अब्ज किंवा 40 टक्के लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये या लसीच्या वापरास मंजुरी मिळाली आहे. 


रशियाची कोरोना लस Sputnik V कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक असल्याचा दावा केला जातोय. रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने दावा केलाय की Sputnik V लस ही 91.6 टक्के प्रभावी आहे. कोविशिल्ड ही 80 टक्के तर कोवॅक्सिन ही 81 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. भारतात सध्या या दोन लसींचा वापर कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये केला जातोय. या दोन लसींचे महिन्याला सात कोटी डोसचे उत्पादन करण्यात येतंय. Sputnik V लस आल्यानंतर या लसींवरची निर्भरता कमी होईल असंही सांगण्यात येतंय.