नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला  5 जून 2021 रोजी  सकाळी 11 वाजता दूरसंवाद पद्धतीने संबोधित करतील. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 'उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन' ही या वर्षीची मुख्य कल्पना आहे.






या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 'वर्ष 2020 ते 2025 मध्ये भारतात इथेनॉल मिश्रण आखणी संदर्भात तज्ञ समितीचा अहवाल' या अहवालाचे अनावरण होईल. जागतिक पर्यावरण दिनाच्या स्मरणार्थ भारत सरकार E-20 नोटिफिकेशन द्वारे   इंधन कंपन्यांना 1 एप्रिल 2023 पासून 20 टक्के इथेनॉल मिसळलेले पेट्रोल विक्रीचे  तसेच BIS निर्देशांना अनुसरून  अधिक इथेनॉल मिश्रणासाठी E12 व E15 निर्देश जारी करणार आहे.


पंतप्रधान पुण्यात तीन ठिकाणी उभारलेल्या E 100 वाटप स्थानकांच्या प्रायोगिक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि  कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प यांचे निर्माते शेतकरी यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करतील.


 


दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलंय, की "उद्या 5 जूनला सकाळी 11 वाजता जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'चांगल्या पर्यावरणासाठी जैवइंधनचा प्रसार करणे' या थीमवर आधारीत कार्यक्रमात भाग घेणार आहे. यावेळी इथेनॉल आणि बायोगॅस वापरण्यासंबंधी शेतकऱ्यांचे अनुभव ऐकण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय आणि वन व हवामान बदल मंत्रालय संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी भारत सरकारने (जीओआय) तेल कंपन्यांना 20 टक्क्यापर्यंत इथॅनॉल-मिश्रित पेट्रोल विक्री करण्यासंदर्भात ई -20 अधिसूचना जारी केली आहे.