एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोटबंदी हा दहशतवादी हल्ला, जबाबदार लोकांना शिक्षा व्हावी – राहुल गांधी
मोदी सरकाने 8 नोव्हेंबर 2016 ला घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज 3 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करत टीका केली आहे.
नवी दिल्ली : नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्ला होता असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी निर्णय घेऊन चलनातून 1 हजार आणि 500 रुपयांच्या बंद केल्या. या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. तर, सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही नोटबंदीला एक संकट म्हटले आहे. ज्याने आपली अर्थव्यवस्था रसातळाला गेली.
काय म्हणाले राहुल गांधी?
"नोटबंदी या दहशतवादी हल्लाला 3 वर्ष पूर्ण झाली, या हल्ल्याने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला. लाखो लोक बेरोजगार झाले, याला जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा देणे बाकी आहे", असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
प्रियंका गांधी काय म्हणाल्या? "नोटबंदीच्या निर्णयाला ३ वर्ष पूर्ण झाली. सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी नोटबंदीवरुन केलेले सर्व दावे आता खोटे ठरले आहेत. नोटबंदी हे एक संटक होते, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था कोलमडली. या तुघलकी निर्णयाची जबाबदारी आता कोण घेणार?", असा प्रश्न करत प्रियंका यांनी सरकारला धारेवर धरले आहे.It’s 3 yrs since the Demonetisation terror attack that devastated the Indian economy, taking many lives, wiping out lakhs of small businesses & leaving millions of Indians unemployed.
Those behind this vicious attack have yet to be brought to justice. #DeMonetisationDisaster pic.twitter.com/NdzIeHOCqL — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 8, 2019
नोटबंदी को तीन साल हो गए। सरकार और इसके नीमहक़ीमों द्वारा किए गए ‘नोटबंदी सारी बीमारियों का शर्तिया इलाज’ के सारे दावे एक-एक करके धराशायी हो गए। नोटबंदी एक आपदा थी जिसने हमारी अर्थव्यवस्था नष्ट कर दी। इस ‘तुग़लकी’ कदम की जिम्मेदारी अब कौन लेगा?#3YrsOfDeMoDisaster
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 8, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement