नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारात पोलिसांवर बंदूक ताणणारा आणि दंगलीत गोळीबार करणारा फरार आरोपी शाहरुखच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शाहरूख आणि त्याचं कुटुंब दिल्ली हिंसाचारानंतर फरार झालं होतं. त्याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या शामलीतून त्याला दिल्लीत आणण्यात आलं आहे. जाफराबादमध्ये 8 राऊंड गोळ्या फायर केल्याचा आणि पोलिसांवर बंदुक रोखल्याचा आरोप शाहरुखवर आहे. दिल्ली पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत. शिवाय, त्याला आश्रय देणाऱ्यांचा देखील तपास सुरू आहे. दिल्लीमध्ये 23, 24 आणि 25 फेब्रुवारीला झालेल्या हिंसेत 47 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक जण जखमी झाले आहे. जाफराबादमध्ये गोळीबार केल्यानंतर शाहरूख आणि त्याचे कुटुंब फरार झाले होते. हिंसाचारानंतर पोलीस शाहरुखचा शोध घेत होती आणि आता त्यांना यश आले आहे. शाहरुखला आता शामलीहून दिल्लीला आणले आहे. अनेक दिवसांपासून दिल्ली गुन्हे शाखेचे पोलीस शाहरुखचा कसून शोध घेत होते. अखेर तो उत्तर प्रदेशमधील शामली येथे दडून बसल्याची माहिती मिळाताच, दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने त्याच्या मुसक्या आवळल्या. Delhi Violence | दिल्ली हिंसाचाराचा आरोपी शाहरूखच्या मुसक्या आवळल्या दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेत 1000हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. तर 350 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आली आहे. संबंधित बातम्या :  Delhi Violence : हिंसाचाराच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना, 48 एफआयआर दाखल Majha Vishesh | दिल्ली पेटवण्याचं पाप कुणाचं? Delhi Riots | हिंसाचारग्रस्त भागात शूट अॅट साईटचे आदेश, डोवाल यांच्याकडून परिस्थितीचा आढावा