नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान झालेल्या हिंसाचारातील संशयितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकरणी व्हिडीओ फूटेजच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांनी 200 संशयितांचे फोटो जारी केले आहेत.


व्हिडीओ फूटेज स्कॅन करुन हे फोटो तयार करण्यात आले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. केंद्राच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेडचे आयोजन केलं होतं. त्या दरम्यान मोठा हिंसाचार घडला होता.


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लाल किल्ल्यावर हिंसाचार करणाऱ्या मोस्ट वॉन्टेड मनिंदर सिंहला अटक केली आहे. मनिंदर सिंह उर्फ मोनी हा दिल्लीच्या स्वरुपनगरचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांच्या मते, मनिंदर सिंहचे वय तीस वर्षे आहे. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये मनिंदर आपल्या हातात तलवार घेऊन दिसतो.


Farmer Protest Update: कृषी कायदे अंमलात आणताना मोदी सरकार कुठे चुकले? शरद पवार म्हणतात..


शेतकरी आंदोलनाच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हजारो लोकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून हिंसाचार घडवला होता. त्यावेळी या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्येही झडप झाल्याचं पहायला मिळालं होतं. काही आंदोलकांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रवेश करुन त्या ठिकाणी शीख धर्माचा ध्वजही फडकवला होता. दिल्ली आंदोलनाच्या दरम्यान 500 हून अधिक पोलिस जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यूही झाला होता.


दिल्ली हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूच्यावर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दीप सिद्धूला अटक केली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यात आणि शेतकऱ्यांना भडकवण्यात दीप सिद्धू सहभागी होता.


दिल्ली पोलिसांनी धार्मिक झेंडा फडकवणे आणि लाल किल्ल्यावर हिंसाचार केल्याप्रकरणी देशद्रोह आणि युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार झाला होता. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि तेथे ध्वजस्तंभावर धार्मिक ध्वज फडकवला होता.


Sachin Tendulkar on Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर यांचे ट्वीट..