Delhi Bomb Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोट (Delhi Red Fort Bomb Blast) घडवणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद याचे पुलवामा (pulwana) येथील घर सुरक्षा यंत्रणांनी आयईडीने उडवून दिले आहे. दहशतवादाविरुद्धच्या कारवाईचा एक भाग म्हणून, सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि संपूर्ण कारवाई नियंत्रित पद्धतीने पार पाडली.

Continues below advertisement


या स्फोटाच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. गुरुवारी फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये या स्फोटाशी संबंधित आणखी एक कार आढळली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार डॉ. शाहीन शाहिद यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, त्याला "व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल" प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे. फरीदाबाद पोलिसांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलिस विद्यापीठात सापडलेल्या संशयास्पद मारुती ब्रेझा कारची चौकशी करत आहेत. संशयास्पद कार आढळल्यानंतर, बॉम्ब शोध पथकाला वाहनाची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क केलेल्या इतर वाहनांची देखील तपासणी केली जात आहे आणि त्यांच्या मालकांची माहिती पडताळली जात आहे.


Delhi Bomb Blast: एन्क्रिप्टेड स्विस अ‍ॅप वापरून रचला दहशतवादी कट 


तपासातून असे दिसून आले आहे की, स्फोटातील मुख्य आरोपी डॉ. उमर मोहम्मद, डॉ. मुझम्मिल अहमद आणि डॉ. शाहीन शाहिदने एन्क्रिप्टेड स्विस मेसेजिंग अ‍ॅप वापरून दहशतवादी मोहिमेचे नियोजन आणि समन्वय साधला होता. स्फोटस्थळावरून मिळालेल्या डीएनए नमुन्यांवरून लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली पांढऱ्या रंगाची हुंडई i-20 कार डॉ. उमर चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.


Delhi Bomb Blast: नुहमध्ये छापे, खत आणि बियाणे विक्रेता ताब्यात


गुरुवारी हरियाणातील नुह येथेही छापे टाकण्यात आले, जिथे पिनांगवा येथील एका खत आणि बियाणे विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी या दुकानातून मोठ्या प्रमाणात एनपीके खत खरेदी केल्याचा संशय आहे. शिवाय, बुधवारी, तपास पथकाने फरिदाबादच्या खंडावली गावात मॉड्यूलची दुसरी कार लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट जप्त केली. फरिदाबाद पोलिसांनी ही कार गावात पार्क करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आणि ती दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिली. तपासात असे दिसून आले की, दहशतवाद्यांनी आयईडी वाहतूक करण्यासाठी तीन कार खरेदी केल्या होत्या. परिणामी, दिल्ली पोलिसांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशन, चौक्या आणि सीमावर्ती भागात अलर्ट जारी केला आहे.


राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ



आणखी वाचा 


Delhi Blast : दिल्लीसह देशभरात सीरियल ब्लास्टचं होतं प्लानिंग? 32 कारचा होणार होता वापर, मास्टर प्लॅनसह तारीखही ठरली, पण...