Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा (Bihar Election Result) आज (14 नोव्हेंबर) निकाल जाहीर होणार आहे. बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरु आहे आहे. सध्या बिहारमधील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Continues below advertisement

बिहार निवडणुकीच्या पहिल्या कलानूसार 243 विधानसभा पैकी एकूण 119 जागेचा कल हाती आला आहे. (सकाळी 8.45 वाजेपर्यंत) यामध्ये एनडीए 75 जागेवर आघाडीवर तर महागठबंधन 38 जागांवर आघाडीवर आहे. तसेच जनसुराज 3 जागेवर आणि इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत.

Continues below advertisement

बिहारमध्ये बहुमतासाठी जादूई आकडा किती? (Bihar Election Result 2025)

बिहारमध्ये बहुमतासाठी जादूई संख्या 122 आहे. राज्यात एकूण 243 विधानसभा जागा आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (११ नोव्हेंबर) संपले. 20 जिल्ह्यांमधील 122 जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 68.42 टक्के मतदान झाले. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 6  नोव्हेंबर रोजी झाले, ज्यामध्ये 18 जिल्ह्यांमधील 121 जागांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात सरासरी 65.08 टक्के मतदान झाले.

एक्झिट पोलनुसार भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता- (Narendra Modi vs Rahul Gandhi)

एक्झिट पोलनुसार, भाजप प्रणित एनडीएला दीडशेहून जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला 145 ते 163 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महागठबंधनला 76 ते 95 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2020  विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Election Result 2020)

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने 74 जागा, जेडीयूने 43 आरजेडीने 75 , एलजेपीने 1, एआयएमआयएमने 5, काँग्रेसने 19, सीपीएमने 2, सीपीआयने 2 आणि बसपाने 1 जागा जिंकल्या होत्या.

बिहार निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट्स, VIDEO: