Delhi Bomb Blast: दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या घटनेपेक्षाही मोठी घटना घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता का? कारण दिल्ली बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणांना अनेक महत्त्वाचे आणि धक्कादायक माहिती मिळाली आहे. आता असा दावा केला जात आहे की दहशतवादी अंदाजे 32 कारमध्ये स्फोटके ठेवून ते देशभरात घेऊन जात मोठा घातपाताच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Continues below advertisement

पुढे आलेल्या माहितीनुसार, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासात सहभागी असलेल्या सूत्रांनी दावा केला आहे की, दिल्लीसह देशभरातील सहा ठिकाणी सीरियल बॉम्बस्फोट घडवून आणण्याची योजना होती, ज्यामध्ये 32 कार वापरल्या गेल्या होत्या, ज्यात मारुती सुझुकी ब्रेझा, मारुती स्विफ्ट डिझायर आणि फोर्ड इकोस्पोर्ट यांचा समावेश आहे. 6 डिसेंबर रोजी दिल्लीतील विविध ठिकाणी मालिका स्फोट घडवण्यासाठी ह्युंदाई आय20 सह सर्व कार वापरण्याचे नियोजित होतं.

Delhi Bomb Blast:  अनेक वेळा विकल्या गेलेल्या वाहनांचा वापर

जप्त केलेल्या बहुतेक कार जुन्या आहेत आणि त्या अनेक वेळा विकल्या गेल्या होत्या. यामुळे मालकांचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी आल्या असत्या. किंबहुना, चारही कार जप्त करण्यात आल्या आहेत. हरियाणातील फरिदाबाद येथील अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच्या कॅम्पसमध्ये ब्रेझा (HR87 U 9988) ही संशयास्पद कार आढळली. दरम्यान तपासात हा परिसर दहशतवादी कारवायांचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. त्या अनुषंगाने आता पोलीस अधिक तपास करत आहे.

Continues below advertisement

यापूर्वी, बुधवारी रात्री, हरियाणातील फरिदाबादमध्ये एक इकोस्पोर्ट (नोंदणी क्रमांक DL10CK0458) बेवारस आढळली. हा व्हाईट टेरर गँग मॉड्यूलचा लपण्याचा ठिकाण असल्याचे मानले जाते. यात एका तरुणालाही अटक करण्यात आली. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. सोमवारी डिझायर कार जप्त करण्यात आली असून या कारमध्ये एक असॉल्ट रायफल आणि दारूगोळा सापडला आहे.

Delhi Red Fort Blast : दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी सकाळी दाखल झाली होती 'ती' कार

दरम्यान, सोमवारी सकाळी बदरपूर सीमा क्रॉसिंगवरून आय-20 कार दिल्लीत दाखल झाली. ती अनेक तास शहरात फिरत होती. लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये ती उडवून देण्याची योजना होती असे मानले जाते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की उमरने अचानक स्फोट घडवून आणला. सोमवारी गर्दी कमी असते, म्हणून त्याने मेट्रो स्टेशनजवळ आणि लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेर बॉम्बस्फोट घडवले. त्याच्या साथीदारांना अटक झाल्यानंतर उमर घाबरला असावा आणि नंतर हि घटना घडली असल्याचा अंदाज आहे.

Delhi Red Fort Blast : पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद चा थेट संबंध?

तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा दहशतवादी स्लीपर सेल पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद दहशतवादी गट चालवत होता. एनआयए आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे, ज्यामध्ये दहशतवाद्यांच्या नवीन डावपेचांचा सखोल तपास समाविष्ट आहे. जम्मू आणि काश्मीरमधील नौगाममध्ये आदिल अहमद जैश दहशतवादी गटाचे कौतुक करणारे पोस्टर लावताना दिसला तेव्हा ही व्हाईट कॉलर दहशतवादी टोळी उघडकीस आली. काही दिवसांनी, आदिलला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये अटक करण्यात आली. दहशतवादी कट उलगडण्यास सुरुवात झाली. या सेलमधील अनेक दहशतवादी अल-फलाह संघटनेसाठी काम करत होते.

सोबतच, संघटनेने दहशतवादी कारवायांपासून स्वतःला दूर ठेवत एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, "एक जबाबदार संघटना म्हणून, आम्ही राष्ट्रासोबत एकजुटीने उभे आहोत आणि राष्ट्राप्रती आमची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो."

Delhi Red Fort Blast : उमरने वेळेआधीच बॉम्बस्फोट केला

लाल किल्ल्यावर 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला. बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेट नावाचा उच्च-तीव्रतेचा स्फोटक होता. प्राथमिक तपासात उमर मोहम्मदने वेळेआधीच बॉम्बस्फोट केल्याचे उघड झाले आहे. डीएनए चाचणीतून उमरचा मृत्यू स्फोटात झाल्याचे पुष्टी झाली आहे.