(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi : दिल्ली पालिकेत आप आणि भाजपचे नगरसेवक पुन्हा आमने-सामने, स्थायी समिती सदस्यांच्या निवडीवरुन गोंधळ
Delhi : दिल्ली महापालिकेत स्थायी समितीच्या (standing committee Elections) सदस्यांच्या निवडीवरून आप आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये गदारोळ झाला.
Delhi standing committee Elections : दिल्ली महापालिकेत महापौर (Mayor) आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीच्या (standing committee Elections) सदस्यांच्या निवडीवरून गदारोळ झाला. आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि भाजपचे (BJP) नगरसेवक सभागृहात आमने-सामने आले. यावेळी सदस्यांनी एकमेकांवर कागद फेकल्याचे पाहायला मिळालं. तसेच काही नगरसेवकांनी ऐकमेकांवर बूट, चप्पल आणि बाटल्याही फेकल्या. त्यामुळं काल (22 फेब्रुवारी) आठव्यांदा रात्री 12 वाजता सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आलं.
Shelly Oberoi : भाजपच्या नगरसेवकांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न : शैली ओबेरॉय
यानंतर स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडीवरुन सभागृहात गदारोळ सुरू झाला. रात्री 12 वाजेपर्यंत सुरु होता. आप आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकमेकांवर कागद फेकले. भाजपच्या नगरसेवकांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती शैली ओबेरॉय यांनी ट्विट करून दिली आहे. भाजप नगरसेवकांनी महापौरांच्या खुर्चीसमोर घोषणाबाजीही सुरू केली.
#WATCH | Delhi: Ruckus between BJP & AAP members inside the MCD house over the election of members of the standing committee. pic.twitter.com/alIZFIFFnr
— ANI (@ANI) February 22, 2023
दिल्लीच्या महापौरपदी शैली ओबेरॉय
डिसेंबर 2022 मध्ये दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. तेव्हापासून इथे महापौराची निवड होणे बाकी होते. अखेर बुधवारी (22 फेब्रुवारी) शैली ओबेरॉय ( Shelly Oberoi) यांची दिल्लीच्या महापौरपदी निवड करण्यात आली. आम आदमी पार्टीच्या शैली ओबेरॉय यांनी भाजपच्या रेखा गुप्ता यांचा 34 मतांनी पराभव केला. तर उपमहापौरपदी आपचे आले मोहम्मद इक्बाल यांची निवड झाली आहे. त्यानंतर आपच्या सदस्यांनी पुन्हा एकदा जल्लोष साजरा केला. या निवडणुकीत गुंडांचा पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
274 मतांपैकी आपला 150 मते तर भाजपला 113 मते
स्थायी समितीच्या निवडणुकीत संख्याबळ आपच्या बाजूने होते. या निवडणुकीत 274 मतांपैकी भाजपला 113 मते तर आपला 150 मते मिळाली. दोन मते अपक्ष नगरसेवकांची होती. ओबेरॉय यांना त्यांच्या पक्षाची सर्व मते मिळाली, तर भाजपला एकूण मतांपेक्षा तीन मते जास्त मिळाली.
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने कमाल केली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यावेळी दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपने कडवी लढत दिली होती. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत आहे. दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर आज (7 डिसेंबर) मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार मैदानात होते. दिल्ली महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: