Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 20 जणांना अटक, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश, तीन पिस्तूलांसह पाच तलवारी जप्त
Delhi Jahangirpuri Violence : हनुमान जयंतीनिमित्त 16 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना दिल्लीतील जहांगीरपुरी येथे घडली होती.
![Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 20 जणांना अटक, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश, तीन पिस्तूलांसह पाच तलवारी जप्त delhi jahangirpuri violence 20 arrested also 2 minors caught see accused list Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 20 जणांना अटक, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश, तीन पिस्तूलांसह पाच तलवारी जप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/17/7015792f7a7ec50ac81220b3dac7af55_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Delhi Jahangirpuri Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना अटक केली आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी तीन पिस्तूलांसह पाच तलवारीही जप्त केल्या आहेत. हनुमान जयंतीनिमित्त 16 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना दिल्लीतील जहांगीरपुरी येथे घडली होती.
या हिंसाचार प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एफआयआरनुसार, ही मिरवणूक जहांगीरपूरच्या सी ब्लॉकमधील जामा मशिदीजवळ पोहोचली त्यावेळी अन्सार नावाच्या एका व्यक्तीने चार-पाच साथीदारांसह मिरवणुकीत सामील लोकांसोबत वाद घालू लागला. यानंतर हा वाद वाढत गेला आणि दगडफेक झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली.
पोलिसांनी या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या 20 आरोपींपैकी चार आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. शोभा यात्रेदरम्यान गोळीबार करणाऱ्या अस्लम यालाही पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात शनिवारी 16 एप्रिल रोजी अचानक हिंसाचार उसळला. हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही लोकांनी दगडफेक सुरू केली. त्यानंतर वातावरण बिघडले आणि हिंसाचार उसळला. या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
अटक करण्यात आलेल्यांची नावे
1. जाहिद (वय, 20)
2. अन्सार (वय, 35)
3. शहजाद (वय, 33)
4. मुख्तार अली (वय, 28)
5. मोहम्मद अली (वय, 18)
6. अमीर (वय, 19)
7. अक्सर (वय, 26)
8. नूर आलम (वय, 28)
9. मोहम्मद अस्लम (वय, 21)
10. झाकीर (वय, 22)
11. अक्रम (वय, 22)
12. इम्तियाज (वय, 29)
13. मोहम्मद अली (वय, 27)
14. अहिर (वय, 35)
15. शेख सौरभ (वय, 42)
16. सूरज (वय, 21)
17. नीरज (वय, 19)
18. सुकेन (वय, 45)
19. सुरेश (वय, 43)
20. सुजित सरकार (वय , 38)
महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)