एक्स्प्लोर

Delhi Murder: लग्नाला नकार देताच बॉयफ्रेंडच्या मुलाचा घेतला जीव, बेडमध्येच लपवला मृतदेह; 300 सीसीटीव्हीच्या तपासातून हत्याकांड उघडकीस

Delhi Murder: लग्नाला नकार देणाऱ्या बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यसाठी तरूणीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढच नाही तर कोणाला कळू नये यासाठी बेडमध्ये मृतदेह लपवला.

नवी दिल्ली : 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येने देशाची राजधानी दिल्ली (Delhi) हादरली. मुलाचा मृतदेह  घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली त्यानंत आता या प्रकरणाने एक नवे वळण घेतले आहे. लग्नाला नकार देणाऱ्या बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यसाठी तरूणीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढच नाही तर कोणाला कळू नये यासाठी बेडमध्ये मृतदेह लपवला. मात्र 300 सीसीटीव्हीच्या तपासातून हत्याकांड उघडकीस आले आहे. 

दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात एका महिलेने 11 वर्षीय दिव्यांश (बिट्टू) ची गळा घोटून हत्या केली. त्यानंतर चिमुकल्या बिट्टूचा मृतदेह बेडमध्ये लपून ठेवला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 24 वर्षीय पूजाला अटक केली आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसर, बॉयफ्रेंडने केलेल्या फसवणुकीमुळे पूजाच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे पूजाने रागाच्या भरात  चिमुकल्या बिट्टूची हत्या केली.10 ऑगस्ट रोजी दुपारी बिट्टू घरात झोपला होता. त्यावेळी पूजाने त्याचा गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृतदेह बेडमध्ये लपून ठेवला,

पूजा आणि जितेंद्र 2019 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. जितेंद्रने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे वचन पुजाला दिले होते.परंतु 2022 साली जितेंद्र पूजाला सोडून आपल्या पत्नीकडे परतला आणि पत्नी आणि मुलासोबत राहायला लागला. या सगळ्या प्रकारानंतर पूजा चिडली होती. जितेंद्रचा राग तिच्या मनात होता. पूजा आणि जितेंद्रच्या नात्यामध्ये बिट्टू येत असल्याने जितेंद्र लग्नाला विरोध करत आहे असे पूजाला वाटत होते. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी पुजाने हे पाऊल उचलले. 

10 ऑगस्टला केली हत्या

10 ऑगस्टला एक कॉमन मित्राच्या मदतीने पुजाने जितेंद्रच्या घराचा पत्ता विचारला.त्यानंतर पूजा जितेंद्रच्या घरी पोहचली तर घराचा दरवाजा उघडा होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पूजा ज्यावेळी घरी पोहचली त्यावेळी घरी कोणी नव्हते. बिट्टू त्यावेळी बेडवर झोपला होता. पूजाने घरात कोणी नाही ही संधी जितेंद्र आणि तिच्या नात्यात अडसर असलेल्या बिट्टूचा गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये लपून पळून गेली.

पूजापर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांनी 300 कॅमेराची मदत घेतली. त्यानंतर पूजाला शोधण्यासाठी नजफगढ़-नागलोई रोड येथील रनहौला, निहाल विहार आणि रिशल गार्डन परिसरातील 300 सीसीटीव्ही कॅमेरा तपासले. त्यानंतर तीन दिवसांनी पूजाला बक्कारवाला परिसरातून अटक केली. अटक केल्यानंतर पुजाने हत्येची कबुली दिली.

हे ही वाचा :

मुंबईमध्ये वृद्धांची सुरक्षा वाऱ्यावर! सेलोटेपने हातपाय बांधले,तोंडात कापसाचा बोळा कोंबला; ताडदेवमध्ये वृद्ध महिलेची हत्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget